Join us

‘पद्मावती’चे समर्थन करणाऱ्या राखी सावंतला धमकी, ‘तर... तुझं तोंड काळं करू’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 8:42 AM

‘पद्मावती’चे समर्थन करणाºया राखी सावंतला करणी सेनेकडून धमकी देण्यात आली असून, तुझं तोंड काळं करू, असे म्हटले आहे. वाचा सविस्तर!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाला विरोधाची धार दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये ‘पद्मावती’ला होत असलेला विरोध पाहता हा चित्रपट शांततापूर्वक रिलीज होईल, असे अजिबातच दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच एका राजपूत संघटनेच्या नेत्याने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे शिर कलम करणाºयास पाच कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली होती. तर करणी सेनेकडून ‘पद्मावती’मध्ये राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. आता राजपूत संघटनेच्या नेत्यांनी ‘पद्मावती’चे समर्थन करणाºया राखी सावंतवर निशाणा साधला असून, तिलाही धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आयटम गर्ल राखी सावंत हिने ‘पद्मावती’च्या समर्थनार्थ सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये राखी ‘पद्मावती’चे समर्थन करीत असतानाच विरोध करणाºया चित्रपट बघण्याची विनंती करताना दिसत होती. त्याचबरोबर राखी करणी सेनेसह इतर सर्व विरोधी संघटनांना अशाप्रकारचा पब्लिसिटी स्टंट करणे बंद करा, असेही सांगत असल्याचे दिसून आले होते. आता राखीच्या याच वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी करणी सेनेने तिला धमकी दिली आहे. सेनेच्या एका नेत्याने ‘अन्यथा तुझे तोंड काळे करू’ असे म्हटले आहे. दरम्यान, राखीप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ‘पद्मावती’च्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. या चित्रपटात दीपिकासह शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. दिवसागणिक चिघळत असलेला वाद पाहता महाराष्टÑ सरकारने संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोणला पोलीस संरक्षण दिले आहे.