Join us

होय, मीच रियासोबत ड्रग्जबद्दल चॅट केलं, पण...; रकुल प्रीतकडून ब्लेमगेम सुरू?

By कुणाल गवाणकर | Updated: September 25, 2020 16:19 IST

अडचणीत येताच रकुल प्रीत सिंहनं रिया चक्रवर्तीवर फोडलं खापर

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) अनेक बड्या कलाकारांची चौकशी सुरू केली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं. या चौकशीदरम्यान रकुलनं ड्रग्ज घेत नसल्याचं स्पष्टपणे अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र आपण ड्रग्जबद्दल रिया चक्रवर्तीसोबत चॅट केल्याची कबुली दिली. रकुलनं दिलेल्या जबाबाची पडताळणी करण्याचं काम आता अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.रकुलनं चौकशीदरम्यान सगळ्याच गोष्टींचं खापर रियावर फोडलं. मी ड्रग्ज घेत नाही. ड्रग्ज विक्रेत्यांशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा तिनं केला. '२०१८ मध्ये रियासोबत चॅटवर ड्रग्जविषयी बोलले होते. रिया चॅटच्या माध्यमातून आपलं सामान (ड्रग्ज) मागवत होती. रियाचं सामान माझ्या घरी होतं', असं रकुलनं सांगितलं. तिच्या जबाबात किती तथ्य आहे, याचा तपास आता एनसीबीकडून केला जाणार आहे.ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रिया चक्रवर्तीची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान रियानं रकुलचं नाव घेतलं होतं. रकुल ड्रग्ज घेत असल्याचं रियानं सांगितलं होतं. रकुल आणि रिया दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र आता अडचणीत येताच त्यांच्याकडून ब्लेमगेम सुरू झाला आहे. रिया ड्रग्ज प्रकरणात भायखळा तुरुंगात आहे. वारंवार प्रयत्न केल्यानंतरही न्यायालयानं तिला जामीन दिलेला नाही.रिया चक्रवर्तीने NCBच्या चौकशीत नाही घेतले कोणत्याच बॉलिवूड सेलिब्रेटीचे नाव, सतीश मानशिंदेंचा दावा

एनसीबीच्या हाती रकुलचे ड्रग्स चॅटआजतकच्या रिपोर्टनुसार रकुल प्रीतचे ड्रग्स चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. रकुलचे हे ड्रग्स चॅट रियासोबतचे आहेत. या चॅटनंतर रकुल एनसीबीच्या रडारवर आली आहे. याशिवाय रियाने आपल्या जबाबामध्ये रकुलचे नाव घेतले आहे. रकुल, सारा आणि श्रद्धा सुशांतच्या फार्म हाऊसवर जाऊन ड्रग्स पार्टी करायच्या असा जबाब रियाने दिला आहे. एनसीबीला अंदाज आहे की रकुलच्या चौकशीत मोठे खुलासे होऊ शकतात. 

रकुलनंतर एनसीबी दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशची चौकशी करणार आहे. दीपिका पादुकोण आणि करिश्माचे ड्रग्स संदर्भातले चॅटसमोर आले आहे.उद्या दीपिका पादुकोणला एनसीबी चौकशीला सामोऱ्य जावं लागणार आहे. कामगार मंत्रालयाकडून दीपिकाचा 'तो' फोटो रिट्विट; थोड्याच वेळात केला डिलीट

रकुल प्रीत सिंगने हिंदी आणि साऊथमधील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.साऊथमधील टॉप अभिनेत्यांसोबत रकुलने स्क्रिन शेअर केली आहे. रकुलने बॉलिवूडमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगणसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे  काल रकुल हैदराबादवरुन मुंबईत आली आहे. रकुल हैदराबादमध्ये सिनेमाची शूटिंग करत होती. 

५० सेलिब्रिटींची यादी तयार ड्रग्जचे कनेक्शन मोठ्या पडद्याबरोबर छोट्या पडद्यावर पोहोचल्याचे आतापर्यंत अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांकडील चौकशीतून स्पष्ट झाले आहे. चित्रपट व टीव्हीवर काम करणाºया सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, बी-ग्रेड निर्मात्यांचा समावेश असून त्यांना टप्प्याटप्प्याने पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

'हिरोंची नावे समोर येणं बाकी' ड्रग्ज प्रकरणात रियाच्या अटकेनंतर आणखी बरीच बॉलिवुडसंबंधित नावे पुढे आली आहेत, परंतु विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त बॉलिवूड अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. याबाबत वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्न या प्रकरणात अद्याप बॉलिवूडच्या अभिनेत्यांची नावे उघड झाली नाहीत, आतापर्यंत केवळ अभिनेत्रींची नावे उघडकीस आली आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरकुल प्रीत सिंगरिया चक्रवर्ती