Join us

लग्नानंतर रकुल-जॅकी भगनानीला थेट अयोध्येतून आशीर्वाद, राम मंदिरातून खास भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:55 IST

रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या नवविवाहित दाम्पत्याला थेट अयोध्येतून आशीर्वाद मिळाले आहेत. 

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. गोव्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. पंजाबी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीने रकुल-जॅकी यांचा विवाह झाला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रकुल-जॅकीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता या नवविवाहित दाम्पत्याला थेट अयोध्येतून आशीर्वाद मिळाले आहेत. 

रकुल-जॅकीने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्वीट करत या नवविवाहत दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आता या नवीन सुरुवातीसाठी रकुल आणि जॅकीला लग्नानंतर अयोध्येतील राम मंदिरातून प्रसाद पाठविण्यात आला आहे. रकुलने याचा फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. "लग्नानंतर अयोध्येतून प्रसाद मिळाला, हे आशीर्वादापलिकडचं आहे. याने आमची सुरुवात आणखी चांगली होईल", असं रकुलने म्हटलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. साऊथ गोवा येथील ITC ग्रँड हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

टॅग्स :रकुल प्रीत सिंगसेलिब्रेटी वेडिंगअयोध्याराम मंदिर