Join us

Ram Charan :आलिशान बंगला, लॅग्झरी कारचं कलेक्शन असलेल्या राम चरणाची एकूण संपत्ती तरी कित्ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:30 PM

हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालक असलेला राम चरण संपत्तीच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे टाकतो.

Ram Charan Unknown Facts: देशात असे फार कमी कलाकार आहेत, ज्यांचे चित्रपट फक्त साऊथमध्येच नाही तर सगळीकडे पाहिले जातात.  यापैकी एक नाव म्हणजे मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा राम चरण. आपल्या अभिनयाने त्यानं लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या कुटुंबाविषयी, त्याच्या संपत्तीविषयी सांगणार आहोत. 

कोट्यवधी रुपयांच्या घरात राहतो रामचरणहैदराबादच्या श्रीमंतांच्या यादीत राम चरण आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, राम चरणची जवळपास १३०० कोटींची प्रॉपर्टी आहे. रामचरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालिक आहे. राम चरण राहत असलेल्या बंगल्याची किंमत ३८ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. राम चरण याचं घर हैदराबादमधील जुबली हिल्स सारख्या प्राईम लोकेशनमध्ये आहे. विशेष म्हणजे राम चरणचं हे घर दाक्षिणात्य सेलिब्रेटींमधील सर्वात महागडं घर आहे. 

लग्झरी कारअभिनयासोबतच राम चरणला कारचीही आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या कारचे कलेक्शन आहे. या अभिनेत्याकडे रोल्स रॉयस फँटमसारखी आलिशान कार आहे, ज्याची किंमत सात कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्याकडे तीन कोटींची अॅस्टन मार्टिन V8 कार देखील आहे. तसेच, त्याच्याकडे रेंज रोव्हर आहे.

राम चरण चित्रपटांव्यतिरिक्त ब्रॅण्ड एंडोर्समेंट्स आणि पर्सनल इन्व्हेसमेंटमधून पैसे कमावतो. सोबतच तो एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. रामचरण हैदराबादमधील एअरलाईन ट्रू जेटचा मालक आहे. याशिवाय त्याची रामचरण हैदराबाद पोलो राइडिंग क्लब नामक पोलो टीम देखील आहे. तो माँ टीव्हीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये देखील आहे. रामचरण एका सिनेमासाठी जवळपास १२ ते १५ कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, एस. एस. राजमौली यांच्या , ‘आरआरआर’ या सिनेमासाठी त्याने 45 कोटी रूपये चार्ज केल्याचे सांगण्यात येतं.

रामचरणचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे ज्याचं नाव आहे कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी. रामचरणने १४ जून, २०१२ साली अपोलो हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनीसोबत लग्न केले आहे.

टॅग्स :राम चरण तेजाआरआरआर सिनेमा