RRR Box Office Records: साऊथ स्टार रामचरण (Ram Charan) व ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) यांचा एस. एस. राजमौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा दीर्घकाळानंतर चित्रपटगृहांत रिलीज झाला आणि रिलीज होताच प्रेक्षकांच्या या सिनेमावर अक्षरश: उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी सिनेमानं जबरदस्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड रचले. पहिल्याच दिवशी ‘आरआरआर’ने सहा मोठ्या विक्रमांवर आपलं नाव कोरलं. त्यावर एक नजर...
आंध्र-तेलंगणाची हाएस्ट ओपनरसाऊथकडे ‘आरआरआर’ने अभूतपूर्व कमाई केली. यामुळे आंध्र प्रदेश व तेलंगणा बॉक्स ऑफिसवर राजमौलींच्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी 100 कोटींची कमाई केली आणि यासोबत ‘आरआरआर’ आंध्र व तेलंगणातील हाएस्ट ओपनर फिल्म बनली.
देशातील नंबर 1 ओपनरभारतातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं जणू त्सूनामी आणली. इंडियन बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 156 कोटी रूपयांची बंपर कमाई करत, नवा इतिहास रचला. या शर्यतीत ‘आरआरआर’ ने राजमौलींच्याच ‘बाहुबली2’ या सिनेमाला देखील मागे टाकलं.
वर्ल्डवाईड नंबर 1 ओपनरकेवळ भारतात नाही तर जगातही या सिनेमानं धुमाकूळ घातला. वर्ल्डवाईड कलेक्शनमध्ये या सिनेमानं एकूण 223 कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच सिनेमा वर्ल्डवाईड नंबर 1 ओपनर ठरला.
2022 मधील सर्वात मोठा ओपनर सिनेमा2022 सालातील ‘आरआरआर’ हा सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही मोठा गल्ला जमवला. हिंदी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्या दिवशी 25 कोटींचा बिझेनस केला आणि 2022 च्या सर्वात मोठी ओपनर चित्रपटाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
अमेरिकेतही डंकाअमेरिकी बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. पहिल्या दिवशी अमेरिकन बॉक्स ऑफिसवर 5 मिलियन डॉलर कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘आरआरआर’ ने स्थान मिळवलं.
रामचरण- ज्युनिअर एनटीआरच्या करिअरमधील हाएस्ट ओपनरराजमौलींचा हा सिनेमा रामचरण व ज्युनिअर एनटीआरच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. ‘आरआरआर’ दोघांच्याही करिअरमधील हाएस्ट ओपनर सिनेमा ठरला.