Join us  

देशसेवेसाठी रामचरणच्या पत्नीने घेतला पुढाकार; BSF जवानांसाठी केलं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 11:38 AM

Ram charan: रामचरणच्या पत्नीने देशसेवेसाठी पुढाकार घेतला असून तिने BSF च्या जवानांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणच्या (Ram Charan) RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता आहे. हा चित्रपट जबरदस्त सुपरहिट ठरल्यामुळे रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. यात दोन्ही कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांची पर्सनल लाइफदेखील चर्चेत येत आहे. यात रामचरणच्या पत्नीने देशसेवेसाठी पुढाकार घेतला असून तिने BSF च्या जवानांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे.

RRR च्या यशानंतर रामचरण त्याच्या आगामी चित्रपटाकडे वळला आहे. या चित्रपटाचं अमृतसरमध्ये चित्रीकरण सुरु आहे. त्यामुळे त्याची पत्नी उपासनादेखील त्याच्यासोबत अमृतसरला गेल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, येथे गेल्यावर उपासनाने BSF जवानांसाठी खास जेवणाचं आयोजन केलं. यावेळचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राम चरणच्या मोठ्या बहिणीला कधी पाहिलंय का? फॅशन जगतात कमावतीये नाव

जवानांसाठी ठेवलं खास जेवण

उपासना आणि रामचरण यांनी अमृतसरमध्ये असलेल्या BSF कॅपमधील जवानांसोबत काही काळ वेळ घालवला.यावेळी उपासनाने सगळ्या जवानांसाठी जेवणाची सोय केली होती. इतकंच नाही तर रामचरणने या जवानांसोबतच जेवणाचा आनंद घेतला.

उपासनाने केलं गुरुद्वारामध्ये लंगर

उपासनाने BSF जवानांसह गुरुद्वारामध्येही लंगरचं आयोजन केलं.  यावेळचे फोटो, व्हिडीओ तिने शेअर केले आहेत.  RRR ला मिळालेलं यश सेलिब्रेट करण्यासाठी तिने सुवर्ण मंदिराला भेट दिली.

रामचरणने शेअर केले फोटो

"अमृतसरच्या BSF कॅम्पसमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या साहसकथा, त्यांचं बलिदान आणि देशासाठी केलेलं समर्पण या सगळ्यांनी भारावून गेलेली एक दुपार", असं कॅप्शन देत रामचरणने BSF जवानांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

हैदराबादच्या खास शेफने केलं BSF जवानांसाठी जेवण

BSF  जवनांसाठी उत्तम प्रतीचं जेवण तयार करण्यासाठी हैदराबादवरुन रामचरणने त्याच्या पर्सनल शेफला बोलावलं होतं. यावेळी त्यांनी BSF जवानांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले. 

टॅग्स :राम चरण तेजाTollywoodआरआरआर सिनेमासेलिब्रिटीसिनेमा