Ram Charan Video: 'आरआरआर'च्या 'नाटू नाटू' या गाण्यानं ऑस्कर जिंकला, तेव्हापासून या गाण्यासोबत रामचरण (Ram Charan) व ज्युनिअर एनटीआर देखील चर्चेत आहेत. हे गाणं रामचरण व ज्युनिअर एनटीआर या दोघांवर चित्रीत केलं आहे. या गाण्यात दोघांनी केलेल्या डान्सने तर अख्ख्या जगाला वेड लावलं आहे. ऑस्कर सोहळ्यासाठी रामचरण गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत मुक्काम ठोकून होता. याचदरम्यानचा रामचरणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात रामचरण व त्याची पत्नी उपासना देवाची पूजाअर्चना करताना दिसत आहेत. मी व माझी पत्नी आम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असू देत आमचं देवघर आमच्यासोबत असतं. आम्ही भारताबाहेर प्रत्येक ठिकाणी आमचं देवघर घेऊन जातो. देवघरातील देवांची मनोभावे पूजाअर्चा करतो, असं रामचरण व्हिडीओत सांगताना दिसतोय.
सोमवारी १३ मार्चला ऑस्कर सोहळ्याला जाण्याआधी रामचरण व त्याची पत्नी उपासना दोघांनी देवघरातील देवांची पूजा केली. त्यांनी व्हॅनिटी फेअर मॅगझिनला मुलाखत दिली. या मुलाखतीचा व्हिडीओ मॅगझिनने आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे.यात रामचरण म्हणतो, मी आणि बायको आम्ही जिथे कुठे जातो आमचं छोटसं देवघर आमच्यासोबत असतं. आम्ही मुक्काम करतो, त्याठिकाणी त्याची स्थापना करतो. देवपूजा करतो. ही एक परंपरा आहे. ती आम्हाला भारताशी आणि आमच्या संस्कृतीशी जोडून ठेवते. मला वाटतं की आपण आपल्या दिवसाची सुरुवात देव आणि लोकांप्रती असलेल्या कृतज्ञतेनं करणं खूप महत्वाचे आहे ज्यांनी आपल्याला आज आपण जिथे उभं केलं आहे.
ऑस्कर अवॉर्डसाठी रवाना होण्यापूर्वी राम आणि उपासना प्रार्थना करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान राम चरणने भारतीय डिझायनर शंतनू आणि निखिल यांनी डिझाइन केलेला काळा ड्रेस परिधान केला होता. त्याचे शूज इटलीहून बनवलेले होते.
रामचरणच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर लवकरच तो बाबा होणार आहे. होय, त्याची पत्नी उपासना गर्भवती आहे. दोघं सध्या अमेरिकेत आहे. उपासना आपल्या बाळाला अमेरिकेतच जन्म देणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र नंतर रामचरण व उपासना दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावलं होतं. आमचं बाळ भारतातच जन्म घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. रामचरणची पत्नी उपासना एक बिझनेसवुमन आहे. अपोलो लाईफची ती व्हाईस प्रेसिडन्ट आहे.