Join us  

'गेम चेंजर' सिनेमाविषयी समोर आलं मोठं अपडेट, आता राम चरण म्हणतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 4:44 PM

'गेम चेंजर' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दक्षिणेनंतर, पॅन इंडिया आणि आता ग्लोबल स्टार बनलेला अभिनेता राम चरण चित्रपटांमध्ये त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अगदी लहानांपासून थोरामोठ्यापर्यंत सर्वांमध्येच प्रसिद्ध आहे. राम चरणचे जगभरात चाहते आहेत. राम चरणच्या RRR या चित्रपटाला केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे. आता चाहते त्याच्या 'गेम चेंजर' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून सिनेमाबद्दल एक मोठं अपडेट समोर आलं आहे. 

नुकतंच रामचरणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये 'गेम चेंजर' सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रामचरण हॅलिकॉप्टरच्या दिशेने जाताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत राम चरणने सिनेमाचं  शुटिंग पुर्ण झाल्याची माहिती आहे.  कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'आता खरा गेम बदलणार. सिनेमाचं शुटिंग पुर्ण झालं आहे. लवकरच सिनेमात भेटूया'.  सिनेमाचं शुटिंग पुर्ण झाल्याने आता चित्रपटाच्या एडिटिंगच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. 

रामचरणसोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत, कियारा अडवाणीही दिसणार आहे. 'गेम चेंजर' चित्रपटाची घोषणा २०२१ मध्ये करण्यात आली होती. चित्रपटाच्या शुटिंगला ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरूवात झाली होती. विशेष म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन 'शिवाजी द बॉस' फेम एस. शंकर यांनी केलं आहे. तर दिल राजू आणि शिरीष या चित्रपटाचा निर्माते आहेत. 

'गेम चेंजर'  येत्या ३१ ऑक्टोबर २०२४ ला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र,  चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.  ऑक्टोबर महिन्यात अनेक मोठे चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतात. ज्युनियर एनटीआरचा 'देवरा', रजनीकांत यांचा 'वेट्टियाँ'  याच महिन्यात रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तिन्ही चित्रपटांमध्ये स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :राम चरण तेजासेलिब्रिटीबॉलिवूडTollywoodकियारा अडवाणी