Join us

अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी राम गोपाल वर्मावर गुन्हा दाखल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 7:54 AM

दिग्दर्शक राम गोपाल वर्माने ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ या चित्रपटातून अश्लीलतेचा प्र्रसार केल्याचा आरोप करीत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर!

दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा आगामी ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडण्याची दाट शक्यता होती. अखेर त्यानुसारच घडले असून, आता त्याचे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली आहे. होय, अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवा हिची भूमिका असलेला हा चित्रपट खूपच अश्लील असल्याचा ठपका ठेवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी, राम गोपाल वर्माविरोधात आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या देवी आणि त्यांच्या सहकाºयांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सेंट्रल क्राइम स्टेशनमध्ये आरजीव्हीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राम गोपाल वर्माने या चित्रपटासंबंधी सोशल मीडियावर बरेचसे फोटो शेअर केले. मात्र यातील एक फोटो अश्लील असून, त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्या तक्रारीत उपस्थित केला. तर दुसरीकडे महिलांच्या एक गटाने चित्रपटावर बंदी घालून तातडीने राम गोपाल वर्माला अटक केली जावी अशी मागणी करीत हैदराबादमध्ये आंदोलन केले. दरम्यान, राम गोपाल वर्माचा हा चित्रपट आज सकाळी ९ वाजता वेबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात पॉर्न स्टार मिया मालकोवाची प्रमुख भूमिका आहे. वास्तविक हा चित्रपट डाक्युमेंट्ररी स्वरूपाचा असून, त्यामध्ये मिया तिचा पॉर्न इंडस्ट्रीतील प्रवास सागताना दिसणार आहे.