Join us

रामगोपाल वर्माने महिलांच्याबाबतीत केले आक्षेपार्ह विधान, होतेय टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 7:20 PM

राम गोपाल वर्माने केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे त्याच्यावर प्रचंड टीका केली जात असली तरी तो आपल्या वक्तव्यावर ठाम आहे.

ठळक मुद्देमहिलांबद्दल तुम्ही असा विचार का करता असे विचारले असता राम गोपाल वर्माने सांगितले की, मी माझे मत बदलणार नाही. मत बदलण्यासाठी माझ्याकडे काहीही कारण देखील नाहीये

रामगोपाल वर्मा सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. आता त्याने महिलांच्या बाबतीत एक विधान करत लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. राम गोपाल वर्माने केलेल्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मला महिलांचे शरीर आवडते, पण मला त्यांचं डोकं आवडत नाही असे विधान त्याने केले आहे. 

राम गोपाल वर्माने केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे त्याच्यावर प्रचंड टीका केली जात असली तरी तो आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. राम गोपाल वर्माने काही दिवसांपूर्वी ईटाइम्सला मुलाखत दिली असून त्यात त्याने सांगितले आहे की, मेंदूला कोणतेही जेंडर नसते. म्हणजे महिलेला डोकं असतं आणि पुरुषाला देखील डोकं असतं. लैंगिक पैलू खूप विशिष्ट आणि ठराविक आहे. एका महिलेकडे एक अतिरिक्त वस्तू असते जी तिची कामुकता आहे आणि ज्याची मी प्रशंसा करतो. 'Guns & Thighs' या पुस्तकातही मी म्हटलंय मला महिलांच शरीर आवडतं पण मला त्यांचं डोकं आवडतं नाही.' 

महिलांबद्दल तुम्ही असा विचार का करता असे विचारले असता राम गोपाल वर्माने सांगितले की, मी माझे मत बदलणार नाही. मत बदलण्यासाठी माझ्याकडे काहीही कारण देखील नाहीये. एवढेच नव्हे तर माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाहीये. मी सध्या कोणत्याही नात्यात नसून भावनिक होऊन मी कुठे अडकलेलो देखील नाहीये.

राम गोपाल वर्माच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे. 

 

टॅग्स :राम गोपाल वर्मा