विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे या चित्रपटाचं कौतुक होतंय. दुसरीकडे या चित्रपटावर टीका करणारेही आहेत. अशात बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनीही ‘द काश्मीर फाईल्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. होय, राम गोपाल वर्मा यांनी या सिनेमाचा रिव्ह्यू दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय हेट काश्मीर फाईल्स’ नावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
काय म्हणले राम गोपाल वर्मा? माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू देत आहे. मी चित्रपटाच्या विषयावर किंवा वादग्रस्त कंटेटचा रिव्हू देत नाही, एक दिग्दर्शक या नात्यानं हा चित्रपट कसा बनवला याचा रिव्ह्यू देऊ इच्छितो..., अशी सुरूवात राम गोपाल वर्मा करतात आणि यानंतर सिनेमाचं जबरदस्त कौतुक करतात. दिग्दर्शक, चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनयाची ते प्रशंसा करतात.
आय हेट काश्मिर फाईल्स... ‘द काश्मीर फाईल्स’चा रिव्ह्यू शेअर करताना राम गोपाल वर्मा यांनी दिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे. ‘मेनस्ट्रिम बॉलिवूड आणि टॉलिवूड द काश्मिर फाईल्सच्या अभूतपूर्व यशाकडे दुर्लक्ष करत आहे. प्रेक्षकांनी हा सिनेमा ज्या गांभीर्यानं घेतला, त्यापेक्षा अधिक गांभीर्यानं ते घेत आहेत. ते शांत आहेत कारण ते घाबरले आहेत..., असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ‘आय हेट काश्मीर फाईल्स’ असं लिहित त्यांनी राम गोपाल वर्माच्या ट्वीट ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं आहे. तू द काश्मीर फाइल्ससा हेट करतोस म्हणून माझं तुझ्यावर प्रेम आहे...,असं विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे.
दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाने कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे.