दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 2002 मध्ये अजय देगवणसोबत ‘कंपनी’ हा सिनेमा बनवला. यानंतर 2003 साली राम गोपाल यांच्या ‘भूत’ या सिनेमातही अजय देवगण दिसला. 2007 मध्ये वर्मा यांनी त्यांच्या ‘राम गोपाल वर्मा की आग’ या ड्रिम प्रोजेक्टमध्ये अजय देवगणलाच कास्ट केले. पण त्यानंतर गेल्या 14 वर्षात राम गोपाल वर्माच्या एकाही सिनेमात अजय देगवण दिसला नाही. का? तर याचा खुलासा खुद्द वर्मा यांनी केली आहे.
बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यावर बोलले. ते म्हणाले, ‘कंपनी हा सिनेमा मी बनवला, तेव्हा अजय देवगण फार मोठा स्टार नव्हता. पण सिंघम नंतर तो मोठा स्टार बनला. आता मी त्याला कंपनी सिनेमासारखे रोल दिले तरी तो त्यात फिट बसेल, असे मला वाटत नाही. चित्रपटाचा जॉनर बघून मी कास्टिंग ठरवतो. मोठ्या स्टार्सला घेतले की तुम्हाला प्रेक्षक मिळतात, सिनेमाला फायदा होतो, यात काहीही शंका नाही. पण केवळ चित्रपट चालावा म्हणून मोठ्या स्टार्सला घेणे याला मी प्रामाणिकपणा मानत नाही.’
कंगना राणौतच्या ‘थलायवी’ या सिनेमाबद्दलही राम गोपाल वर्मा बोलले. ते म्हणाले, जयललिता यांच्या आयुष्याचा कॅनव्हास खूप मोठा आहे. पण त्यांच्या आयुष्यात जो सर्वात मोठा ड्रामा झाला तो त्यांच्या वयाच्या 50 ते 60 दरम्यान झाला. यामुळे जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी माझ्या मते, कमीत कमी 50 वर्षांची हिरोईल असायला हवी. तेव्हाच ती त्या भूमिकेला न्याय देऊ शकेल. जयललिता हे नाव किती मोठे होते, हे सर्व जाणतात. त्यामुळे त्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्यांच्या व्यक्तिरेखेशी साम्य सांगणारी असणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.