बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan) पत्नी किरण रावसोबत (Kiran Rao) घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. आमिर आणि किरण यांनी परस्परांच्या सहमतीनं घटस्फोट घेत असल्याचं सांगितलं. दोघांनीही ऑफिशिअल स्टेटमेंंट जारी करत, घटस्फोटाच्या निर्णयाची माहिती दिली. अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचा आदर केला. पण ट्रोल करणाऱ्यांचीही कमतरता नव्हती. अनेकांनी आमिर व किरण या दोघांनाही ट्रोल करण्यास सुरूवात केली. आमिर व किरण राव या ट्रोलर्सला उत्तर देण्याच्या भानगडीत पडणा-यांपैकी नाहीत. पण दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma) हे मात्र लगेच किरण व आमिरच्या बाजुने मैदानात उतरले. ट्रोलर्सला त्यांनी चांगलंच सुनावलं.
घटस्फोटावरून आमिर व किरणला ट्रोल करणाऱ्यांना राम गोपाल वर्माचं उत्तर; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 13:06 IST
आमिर व किरण रावच्या घटस्फोटाच्या निर्णयांचा अनेकांनी आदर केला. पण ट्रोल करणाऱ्यांची संख्याही कमी नाही...
घटस्फोटावरून आमिर व किरणला ट्रोल करणाऱ्यांना राम गोपाल वर्माचं उत्तर; म्हणाला...
ठळक मुद्दे ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती.