Join us  

'कंपनी'साठी अजयऐवजी शाहरुख होता पहिली पसंती; 'या' कारणामुळे राम गोपाल वर्मांनी केलं रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 1:24 PM

Ram gopal varma: मलिक या भूमिकेत अजयऐवजी शाहरुख झळकावा अशी राम गोपाल वर्मा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शाहरुखशी संपर्कदेखील साधला होता.

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेले सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यात 'सरकार', 'कंपनी' आणि 'सत्या' हे सिनेमा तर बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. राम गोपाल वर्मा यांनी आतापर्यंत अमिताभ बच्चन, अजय देवगण यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. यामध्ये त्यांच्या कंपनी या सिनेमात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, या सिनेमासाठी अजय पहिली पसंती नव्हता. या सिनेमासाठी राम गोपाल वर्मा यांची एका दुसऱ्याच अभिनेत्याला पसंती होती.

राम गोपाल वर्मा (ram gopal varma) यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर कंपनी सिनेमाशी निगडीत एक किस्सा सांगितला. या सिनेमात अजय देवगण, विवेक ओबेरॉयसह अनेक दिग्गज कलाकार मंडळी झळकली होती. या सिनेमात अजयने मलिक ही मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, या भूमिकेसाठी अजय पहिली पसंती नव्हता.

शाहरुख होता दिग्दर्शकांची पहिली पसंती

मलिक या भूमिकेत अजयऐवजी शाहरुख (shahrukh khan) झळकावा अशी राम गोपाल वर्मा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शाहरुखशी संपर्कदेखील साधला होता. परंतु, शाहरुखची बॉडी लँग्वेज मलिकच्या भूमिकेसाठी सूट होत नव्हती. त्यामुळे मग त्यांनी शाहरुखऐवजी अजयची निवड केली.

"मी मलिकच्या भूमिकेसाठी शाहरुखची भेट घेतली होती. ही भूमिका त्याने साकारावी अशी माझी इच्छा होती. परंतु, त्याची बॉडी लँग्वेज या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हती. त्यामुळे मग मी हा विषय पुढे नेला नाही. एक अभिनेता असतो आणि एक आर्टिस्ट असतो. शाहरुख एक आर्टिस्ट आहे जो इंडस्ट्रीमध्ये प्रचंड सक्रीय आहे. आणि, त्याच्यामुळेच लोकांना तो आवडतो", असं राम गोपाल वर्मा म्हणाले.

दरम्यान, कंपनी हा सिनेमा २००२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ९.५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर  २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीअजय देवगणराम गोपाल वर्माशाहरुख खान