महिला दिनी हे काय बरळले राम गोपाल वर्मा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2017 9:02 AM
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे. आज जागतिक ...
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एक नवा वाद ओढवून घेतला आहे. आज जागतिक महिला दिनी, राम गोपाल यांनी एका पाठोपाठ एक अनेक वादग्रस्त tweets केलेत. ‘सर्व महिला पुरूषांना तितकाच आनंद देतील, जितका सनी लिओनीने दिलाय, अशी अपेक्षा मी जागतिक दिनी करतो’, असे एक संतापजनक tweetही त्यांनी केले. }}}}रामू इथेच थांबले नाहीत, त्यांनी रक्त खवळेल, असे अनेक tweets केलेत. ‘महिला दिनाला पुरूष दिन म्हणून संबोधले जायला हवे. कारण पुरूष महिलांना त्या मर्यादेपर्यंत सेलिब्रेट करतात. जितक्या महिला महिलांना करत नाही,’ असे एका tweetमध्ये ते बरळले. ‘महिलांनी किमान आजच्या दिवस न किंचाळता पुरूषांना थोडे स्वातंत्र द्यावे,’ असेही ते म्हणाले. आजच्या दिवशी पुरूष महिलांसोबत काय करत असतील, मला ठाऊक नाही. पण मी या दिवसाला पुरूषांचा महिला दिन म्हणून विश करतो. सर्व पुरूषांकडून सर्व महिलांना पुरूष दिवसाच्या शुभकामना, असे त्यांनी लिहिले. त्यांच्या या tweetवर नंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. }}}} अलीकडे ‘सरकार3’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी राम गोपाल यांनी नकळतपणे जितेन्द्र यांना कमी लेखले होते. ‘सरकार’ सीरिजमध्ये अमिताभ बच्चनऐवजी जितेन्द्रला घेतले असते तर हा चित्रपट अजिबात चालला नसता, असे ते नकळतपणे बोलून गेले होते. यानंतर त्यांनी टायगर श्रॉफला ‘बिकनी बेब’म्हणत डिवचले होते. राम गोपाल वर्मा सध्या आगामी ‘सरकार3’या चित्रपटात बिझी आहेत. ‘सरकार’सीरिजमधील हा तिसरा भाग आहे. विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता अमित साध, यामी गौतम यांच्यासोबतच टायगरचे वडील म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफसुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.