Join us

म्हणे, ‘अनहॅपी मदर्स डे’! राम गोपाल वर्मांचे ‘विचित्र’ ट्विट वाचून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 5:05 PM

संपूर्ण जगाने हॅपी मदर्स डे म्हणत आईला शुभेच्छा दिल्या. राम गोपाल वर्मा यांनी काय तर ‘अनहॅपी मदर्स डे’ म्हणत स्वत:च्याच आईला शुभेच्छा देणे टाळले.

ठळक मुद्देराम गोपाल वर्मा यांनी स्वत:च्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा देणे टाळले. मात्र तेलगू अभिनेत्री अप्सरा राणीच्या आईला मात्र त्यांनी न विसरता विश केले.

काल मदर्स डे संपूर्ण देशभर साजरा झाला. फिल्मी स्टार्सनीही आपल्या आईला भरभरून शुभेच्छा दिल्यात. आईच्या अनेक आठवणी,  किस्से, तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सेलिब्रिटींनी मदर्स डे साजरा केला. यादरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी मात्र  असे काही ट्विट केले की, ते वाचून सगळेच हैराण झालेत.संपूर्ण जग हॅपी मदर्स डे म्हणत असताना राम गोपाल वर्मा यांनी काय तर ‘अनहॅपी मदर्स डे’ लिहित आपल्या स्वत:च्याच आईला शुभेच्छा देणे टाळले. त्यांनी फक्त काही मोजक्याच माऊलींना मदर्स डे विश केला.आता असे का तर त्याचे उत्तरही त्यांनी दिले. ( Ram Gopal Varma wish his mother unhappy mothers day on twitter)

त्यांनी लिहिले, ‘प्रत्येक आई मुलांना जन्म देते. पण मी फक्त त्याच माऊलींना शुभेच्छा देऊ इच्छितो, ज्यांनी क्वालिटी प्रॉडक्ट जन्मास घातले. माझ्यासारख्या बेकार माणसाला जन्म दिल्यामुळे माझ्या आईला मी अजिबात शुभेच्छा देणार नाही. मॉम, तुला खूप अनहॅपी मदर्स डे... कारण मी तुला आनंदाचा एक दिवसही देऊ शकलो नाही...’राम गोपाल वर्मा यांचे हे ट्विट वाचून साहजिकच प्रत्येकजण हैराण झाला.

अप्सरा राणीच्या आईचे मानले आभार...

राम गोपाल वर्मा यांनी स्वत:च्या आईला मदर्स डेच्या शुभेच्छा देणे टाळले. मात्र तेलगू अभिनेत्री अप्सरा राणीच्या आईला मात्र त्यांनी न विसरता विश केले. ‘हे मी तुझ्या आईला व्यक्तिश: आभार देऊ इच्छितो, जिने तुझ्यासारख्या एंजलला जन्म दिला. मी फक्त तुझ्या आईसारख्या माऊलींना विश करू इच्छितो़ जिने तुझ्यासारख्या जबदस्त मुलीला जन्म दिला,’ असे त्यांनी अन्य एका ट्विटमध्ये लिहिल़े.राम गोपाल वर्मा यांच्याच ‘थ्रीलर’ या सिनेमातून अप्सरा राणीने बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यावेळी राम गोपाल वर्मा यांनी अप्सरा राणीचे एका पाठोपाठ एक असे आठ फोटो शेअर केले होते आणि या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले होते. यानंतर अप्सराचे केवळ 7 तासांत 10 हजार फॉलोअर्स वाढले होते. राम गोपाल वर्मा यांचे मानाल तर अप्सराही ही एक उत्तम डान्सर आहे त्यापेक्षा उत्तम अभिनेत्री आहे.

अप्सरा राणी दुसरी कुणी नसून तेलगू अभिनेत्री अंकेता महाराणा आहे. तेलगू इंडस्ट्रीतील ती एक ओळखीचा चेहरा आहे.

टॅग्स :राम गोपाल वर्मा