बॉलिवूडची क्वीन अशी ओळख मिळवलेली कंगना रणौत अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कंगना अभिनयाबरोबरच बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. अनेकदा वक्तव्यांमुळेही कंगना चर्चेत येत असते. कंगना अनेक ठिकाणांनाही भेटी देताना दिसते. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कंगनाने हजेरी लावली होती. यादरम्यानचा कंगनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कंगनाने खास पारंपरिक लूक केला होता. पांढऱ्या रंगाची भरजरी साडी नेसून कंगना या सोहळ्यासाठी उपस्थित होती. रामललाची प्राणप्रतिष्ठापना होताच कंगनाने मंदिराच्या आवारातच मोठ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं आहे. कंगनाच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
एकाने कमेंट करत "स्पीकर फाटले असतील", असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "भाजपाचं तिकीट कन्फर्म", अशी कमेंट केली आहे. "ओव्हर एक्टिंगचे पैसे कापा", असंही म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने "लिडरचे हात पकडूनही चित्रपट हिट होत नाहीत", अशी कमेंटही केली आहे. "तरी पण प्रसिद्धी मिळणार नाही", असंही म्हटलं आहे.
अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. या सोहळ्याला कंगना रणौतबरोबर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आलिया भट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, रोहित शेट्टी, माधुरी दीक्षित यांनीही सोहळ्याला हजेरी लावली होती. २३ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.