Ram Rahim rape case : सिनेमाचे ‘अॅक्शन हिरो’ बाबा गुरमीत राम रहीम दोषी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 9:53 AM
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज शुक्रवारी निकाल देत बाबाला दोषी ठरवले. २००५ ...
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट आज शुक्रवारी निकाल देत बाबाला दोषी ठरवले. २००५ साली गुरमीत राम रहीम यांनी चित्रपटात एन्ट्री केली होती. गत दोन वर्षांत त्यांनी पाच चित्रपट बनवले. यात गुरमीत राम रहीम अतिशय खतरनाक असे स्टंट करताना दिसले होते. हे पाचही चित्रपट फार कमाई करू शकले नाहीत. पण राम रहीम यांनी या चित्रपटांनी रेकॉर्डतोड कमाई केल्याचा दावा केला होता. गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. गुरमीत राम रहीम यांनी आपल्या चित्रपटांना फायद्यात दाखवण्यासाठी काय काय केले, तेच येथे जाणून घेऊन यात.एमएसजी : द मॅसेंजर आॅफ गॉड फेबु्रवारी २०१५ मध्ये गुरमीत राम रहीम यांचा ‘एमएसजी : द मॅसेंजर आॅफ गॉड’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाने शंभर कोटींवर गल्ला जमवल्याचा दावा केला गेला होता. मात्र मीडियाचे मानाल तर या चित्रपटाने केवळ १६.६५ कोटी रुपए कमावले होते. या चित्रपटाचे बजेट ३० कोटी होते. म्हणजेच, मीडियाचे खरे मानाल तर याअर्थाने गुरमीत राम रहीम यांना १३.३५ कोटींचा तोटा झाला होता. चित्रपट फ्लॉप होतोय, असे दिसताच गुरमीत राम रहीम यांनी सगळ्या चित्रपटगृहांचे तिकिटे एकत्र खरेदी केल्याचे म्हटले जोते. हा चित्रपट ६६५ स्क्रीन्सवर रिलीज झाला होता.एमएसजी2 : द मॅसेंजर पहिल्या चित्रपटानंतर सात महिन्यांनी गुरमीत राम रहीम यांनी दुसरा चित्रपट ‘एमएसजी2 : द मॅसेंजर’ रिलीज केला. या चित्रपटाने तिसºया आठवड्यांपर्यंत २७५ कोटींचा बिझनेस केल्याचा दावा केलो गेला. यानंतर चित्रपटाने ३०० कोटींचा पल्ला गाठल्याचे म्हटले गेले. पण मीडियाचा दावा खरा मानाल तर या चित्रपटाने केवळ १७ कोटींचा बिझनेस केला होता.एमएसजी : द वॉरियर लॉयन हार्ट २०१६ मध्ये गुरमीत राम रहीम यांनी तिसरा चित्रपट आणला. हा चित्रपट पंजाबात हाऊसफुल आहे, असा दावा केला गेला होता. पण एका आघाडीच्या दैनिकाने या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात केवळ ५.७५ कोटी रुपएच कमावल्याचे म्हटले होते. मीडियाच्या अन्य बातम्यांमध्ये या चित्रपटाने एकूण १७.६० कोटींची कमाई केल्याचा दावा केला गेला होता. या चित्रपटाचा बजेट १८ कोटी होता.हिंद का नापाक को जवाब : एमएसजी लॉयन हार्ट2 यंदा फेबु्रवारीत आलेला हा चित्रपट सर्जिकल स्ट्राईकवर आधारित होता. हा चित्रपट ‘द वॉरियर लॉयन हार्ट’चा दुसरा पार्ट असल्याचे म्हटले गेले होते. या चित्रपटात गुरमीत राम रहीम हे भारतीय हेर ‘शेर ए हिंद’च्या रूपात दिसले होते. १२ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १४ कोटींचा बिझनेस केल्याचा दावा मीडियाने केला होता. याऊलट निर्मात्यांनी मात्र या चित्रपटाने सात दिवसांत १०० कोटी कमावल्याचा दावा केला होता.जत्तू इंजिनिअर मे महिन्यांत गुरमीत राम रहीम यांचा ‘जत्तू इंजिनिअर’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने चार आठवड्यांत ३९५ कोटींचे कलेक्शन केल्याचा दावा केला होता. मात्र मीडिया रिपोर्ट्सचे मानाल तर ९ कोटींत तयार झालेल्या या चित्रपटाने ९.८३ कोटी रूपयांचा बिझनेस केला होता.