Join us

'रमैया वस्तावैया'च्या अभिनेत्याने घेतला बॉलिवूडमधून संन्यास, सांभाळतोय फॅमिली बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:51 IST

Girish Kumar : बॉलिवूड अभिनेता गिरीश कुमारने रमैया वस्तावैया या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यानंतर त्याने अभिनयाला रामराम केला.

अभिनेता गिरीश कुमार(Girish Kumar)ने 'रमैया वस्तावैया' (Ramaiya Vastavaiya Movie) या चित्रपटातून पदार्पण केले. त्याचा चित्रपटातील अभिनय आवडला पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यांच्यासोबत अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी काही आता स्टार बनले आहेत. पण गिरीशची अभिनय कारकीर्द काही खास नव्हती. 

गिरीशने रमैया वस्तावैया या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुती हासन आणि सोनू सूद मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.  रमैया वस्तावैया सिनेमानंतर गिरीशने लवशुदामध्ये काम केले पण हा चित्रपट देखील फ्लॉप ठरला. गिरीश हा निर्माता कुमार एस तौरानी यांचा मुलगा आहे. 

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर गिरीशने आपल्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला. अभिनय सोडून गिरीश आता कौटुंबिक व्यवसाय सांभाळत आहे. गिरीश गिरीश टिप्स इंडस्ट्रीजमध्ये सीओओ आहे. ज्यामुळे त्याला भारतातील सर्वात मोठ्या मनोरंजन कंपनीत मध्यवर्ती भूमिका देण्यात आली आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार आता त्यांच्या कंपनीचे बाजारमूल्य १० हजार कोटींहून अधिक आहे. गिरीश हा फॅमिली मॅन झाला आहे. त्याला एक मूलही आहे. गिरीश आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतो.