Join us
Daily Top 2Weekly Top 5

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रावण बनणार नाही यश; ८० कोटींची ऑफर नाकारली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 11:14 IST

'रामायण' सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात यश रावणाची भूमिका साकारणार नसल्याचं समजत आहे. 

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बजेट असलेल्या या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार यश या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा होत्या. पण, आता या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारींच्या रामायण सिनेमात यश रावणाची भूमिका साकारणार नसल्याचं समजत आहे. 

'रामायण' सिनेमात रावणाची भूमिका साकारण्यासाठी यशची निवड झाल्याची माहिती होती. सुरुवातीला यशने नकार दिला होता. पण, नंतर ही भूमिका साकारण्यासाठी तो तयार झाल्याच्या चर्चा होत्या. पण, याबाबत नेमकी माहिती समोर आली होती. 'रामायणा'तील रावणाच्या भूमिकेसाठी त्याला ८० कोटींची ऑफरही देण्यात आली होती. पण, यशने रावणाची भूमिका साकारण्यास नकार दिला आहे. 

'झूम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'रामायण' टीमबरोबर यश जोडला गेला आहे. पण, रावणाच्या भूमिकेसाठी नाही. या सिनेमासाठी निर्मिती करण्याचा विचार यश करत आहे. याबाबत यशने अद्याप कोणतंही भाष्य केलेलं नाही. दरम्यान, 'रामायण'मध्ये लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे. तर शीबा चड्ढा मंथराच्या भूमिकेत आहे. या सिनेमाच्या सेटवरील काही फोटोही लीक झाले होते. त्यानंतर नितेश तिवारींनी सेटवर नो फोन पॉलिसी लागू केली आहे. 

टॅग्स :यशरामायणसेलिब्रिटी