Join us

सलमान खानच्या ‘रेस3’ला कुणीही कितीही वाईट म्हणोत, पण ‘रेस4’ बनणारचं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 9:07 PM

निर्माते रमेश तौरानी यांनी ‘रेस3’वर टीका करणाऱ्यांना थेट ‘हितशत्रूं’च्या यादीत बसवत ‘रेस4’ येणार आणि येणारचं, असे जाहिर केले आहे.

सलमान खान स्टारर ‘रेस3’वर कितीही मीम्स बनोत, समीक्षक या चित्रपटाला कितीही वाईट ठरवोत. ‘रेस3’च्या मेकर्सला यामुळे जराही फरक पडत नाही. होय, ‘रेस3’च्या निर्मात्यांचे मानाल तर हा चित्रपट हिट आहे आणि आता या हिट फ्रेन्चाईजीचा चौथा पार्ट येणार आहे. निर्माते रमेश तौरानी यांनी ‘रेस3’वर टीका करणाऱ्यांना थेट ‘हितशत्रूं’च्या यादीत बसवत ‘रेस4’ येणार आणि येणारचं, असे जाहिर केले आहे.होय, ज्यांना ‘रेस3’चे यश पाहावले गेले नाही, त्यांनीच या चित्रपटाला नावं ठेवलीत. टीका केली. खरे तर ‘रेस3’ आमच्या प्रॉडक्शन हाऊसचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट आहे. अनेक लोकांनी आमच्या या चित्रपटाला सुमार ठरवले. पण मला त्याने काहीही फरक पडत नाही. ‘रेस3’नंतर याचा चौथा पार्टही येणार, असे तौरानी म्हणाले.‘रेस4’च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. दोन वर्षांनंतर ‘रेस4’ प्रेक्षकांच्या भेटीस येईल. यात सलमान खान असेल की नाही, हे मी आत्ताच सांगू शकत नाही. कारण ते स्क्रिप्टवर अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.आता ‘रेस3’ सर्वात मोठा हिट आहे, या तौरांनीच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण ज्यांनी कुणी ‘रेस3’ पाहिला, त्यांनी तरी ‘रेस3’ हा या फ्रेन्चाईजीचा सगळ्यांत वाईट चित्रपट असल्याचेच म्हटले. या चित्रपटामुळे सलमान खानचं नाही तर याचा दिग्दर्शक रेमो डिसुजा यालाही टीकेचे धनी व्हावे लागले. ‘रेस3’ या वर्षातील सर्वाधिक वाईट चित्रपट ठरवला गेला. याऊपरही निर्मात्यांना ‘रेस4’ बनवायचा निर्धार पक्का असेल तर त्यांना शुभेच्छाच द्यायला हव्यात.

 

टॅग्स :सलमान खान