'बाहुबली' (Bahubali) चित्रपटात भल्लाल देव (Bhallala deva) ची भूमिका साकारणारा राणा दग्गुबतीचा (Rana Daggubati) आज वाढदिवस आहे. राणाचा आज ३७ वा वाढदिवस आहे. राणा दग्गुबतीचा जन्म १४ डिसेंबर १९८४ रोजी झाला. राणा हा साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार आहे. अभिनेता असण्यासोबतच राणा एक चांगला फोटोग्राफर देखील आहे. तिचे वडील डी सुरेश बाबू तेलुगू सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.
राणाला एका डोळ्याने दिसत नाही राणा उजव्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्याचा उजवा डोळा लहानपणी कोणीतरी डोनेट केला होता पण त्यात कधीच दृषटी येऊ शकली नाही. एका शोदरम्यान राणा म्हणाला होता, 'मला उजव्या डोळ्याने दिसत नाही. मी फक्त माझ्या डाव्या डोळ्याने पाहतो. मी माझा डावा डोळा बंद केला तर मला काहीही दिसत नाही.
कशी तयारी झाली भल्लालदेवची भूमिका? भल्लालदेव बनण्यासाठी राणीने फार मेहनत केली होती. आणि त्याने घेतलेली मेहनत पडद्यावर बघायला मिळाली. असे सांगितले जाते की, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाला रोज ४ हजार कॅलरीज घ्याव्या लागत होत्या. इतक्या मोठ्या इनटेकसाठी राणा एका दिवसात ४० अंडी खात होता. त्यासोबतच जिममध्ये ८ तास घालवत होता. एक सामान्य माणूस दिवसातून तीन वेळा जेवतो. पण भल्लालदेव बनण्यासाठी राणा एकाच दिवसात आठ वेळा जेवण करत होता. दर दोन तासांनी तो भातही खात होता.
राणाने सांगितले होते की, या भूमिकेसाठी त्याने आपलं वजन १०० किलोपर्यंत वाढवलं होतं. इतकं वजन झाल्यावर साधारणपणे कुणाचंही पोट बाहेर दिसेल. पण राणाने मेहनत घेतली. त्याने वजन तर वाढवलं पण ते केवळ आणि केवळ मसल्सच्या रूपात दिसलं. राणा दग्गुबातीने काही बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्याने बिपाशा बसुसोबतही सिनेमा केला आणि अक्षय कुमारसोबतही केला. साउथमध्ये त्याने आपली एक वेगळी जागा निर्माण केली. त्याचा अॅक्शन अंदाज लोकांना अधिक भावतो. दरम्यान कोरोना काळात राणाने लग्नही केलं. सोशल मीडियावर त्याचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.