'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका गाजवणारा अभिनेता म्हणजे राणा दग्गुबाती. आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर राणाने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. राणाच्या फिटनेसचेही अनेक जण चाहते आहेत. त्यामुळे त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. नुकतेच एका मुलाखतीमध्ये खुद्द राणाने आपण फिटनेस फ्रीक नसल्याचं म्हटलं आहे.
एका मुलाखतीमध्ये राणा म्हणाला की, "मी फारसा फिटनेस फ्रीक नाही. हे चित्रपटांसाठी करावे लागतं. जर मी शूटिंग केलं नसतं. तर मी प्रशिक्षणही घेतल नसतं. बाहुबलीसारखा चित्रपट असल्यास तम्हाला बॉडी बिल्डर टाईप ट्रेनिंग घ्यावं लागतं. 'बाहुबली'च्या 'भल्लालदेव'साठी खूप मेहनत घ्यावी लागली होती.
राणाला फिटनेस टिप्स देण्यास सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, "फिटनेसबाबत कोणालाही टिप्स देऊ शकेल, एवढा मी योग्य व्यक्ती नाही. मी सांगेल तसे करु नका, ते धोकायदायक ठरू शकतं. उलट मीच हैदराबादमध्ये आठवड्यातून तीन वेळा बिर्याणी खातो".
राणाने बाहुबली सिनेमात भल्लालदेव ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यानं खूप मेहनत घेतली होती. भूमिकेची गरज म्हणून राणाने जे काही बॉडी ट्रान्साफॉर्मेशन केलं. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला. या भूमिकेसाठी राणाने वजन तर वाढवलंच शिवाय बॉडीदेखील कमावली होती.
राणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत त्याने अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. यापैकी बाहुबली चित्रपटातील त्यांचं भल्लालदेव हे पात्र आयकॉनिक आहे, जे प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. याशिवाय तो बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला. 'हाऊसफुल 4', 'गाझी अटॅक', 'हाथी मेरे साथी', 'न्यूयॉर्क में स्वागत है', 'ये जवानी है दिवानी', 'बेबी' यातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.