Join us

Luv Ranjan Film : रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 12:54 PM

गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह रंजन यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या शुटचे काही फोटो देखील मध्ये व्हायरल झाले होते.

रणबीर कपूर(Ranbir Kapoor)आणि आलिया भट (Alia Bhatt) आई बाबा झाल्यानंतर दोघांनीही पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. रणबीर कपूर लवकरच लव्ह रंजन (Luv Ranjan) यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. यामध्ये रणबीर आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून लव्ह रंजन यांच्या चित्रपटाची चर्चा आहे. रणबीर आणि श्रद्धाच्या शुटचे काही फोटो देखील मध्ये व्हायरल झाले होते. मात्र चित्रपटाचे नाव अजुनही गुलदस्त्यातच आहे. चाहत्यांना चित्रपटाची आणि रणबीर श्रद्धाला एकत्र बघण्याची उत्सुकता आहे. तर आता मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाचा खास व्हिडिओ ख्रिसमसच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. 

सिनेमाचे 'टायटल आणि रिलीज डेट'च्या घोषणेसाठी एक खास व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ ख्रिसमसच्या मुहुर्तावर चाहत्यांसाठी गिफ्ट असणार आहे. पुढील आठवड्यात अवतार २ (Avatar : The Way of Water) प्रदर्शित होतोय. अवतार २ ची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चित्रपटाची खास स्क्रीनिंगही होणार आहे. याच स्क्रीनिंगला लव रंजन यांच्या चित्रपटाच्या घोषणेचा व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांसाठी ही डबल ट्रीट असणार आहे. अवतारच्या स्क्रीनिंगला अनेक लोक असणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल अशी लव्ह रंजन यांची योजना आहे. १६ डिसेंबर रोजी अवतार २ प्रदर्शित होतोय. 

टायटल रिलीज नंतर ट्रेलर, गाणी हे एकामागे एक रिलीज होतील अशी मेकर्सची प्लॅनिंग आहे. 

टॅग्स :सिनेमारणबीर कपूरश्रद्धा कपूर