Join us

आलिया रणबीरला कन्यारत्न झाले, पण 'करण जोहर' का होतोय ट्रोल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 6:02 PM

निर्माता करण जोहर का ट्रोल होतोय ? रणबीर-आलिया आई बाबा झाले आहेत यात करणला ट्रोल करण्याचे कारणच काय ?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ला आज कन्यारत्न प्राप्त झाले. अख्खे बॉलिवूड रणबीर आणि आलियाचे अभिनंदन करत आहेत. नेटकऱ्यांनी दोघांबद्दल अनेक पोस्ट केल्या आहेत. मात्र या सगळ्यात निर्माता करण जोहर का ट्रोल होतोय ? रणबीर-आलिया आई बाबा झाले आहेत यात करणला ट्रोल करण्याचे कारणच काय ?

ट्रोलर्स काही करण जोहरचा पिच्छा सोडत नाही असेच दिसतेय. आलिया भट्टने आज सकाळी मुलीला जन्म दिला. याचा सर्वांनाच आनंद झाला. मात्र दुसरीकडे ट्रोलर्स वेगळ्याच पोस्ट मध्ये व्यस्त होते. करण जोहर स्टारकीड्सला च लॉंच करतो नेपोटिझमचा आरोप त्याच्यावर केला जातो. यावरुनच करण पुन्हा ट्रोल झालाय. आलिया रणबीरच्या मुलीला बघून ही मुलगी अभिनेत्री होईल असं म्हणतानाचा फोटो नेटकऱ्यांनी व्हायरल केलाय.

तर दुसरीकडे एका ट्रोलरने करण जोहरचा डान्स करतानाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये प्रेम रतन धन पायो या गाण्यावर दिलखुलास नाचताना दिसत आहे. एकीकडे आलिया रणबीरने मुलीचे स्वागत केले आहे तर दुसरीकडे करण जोहर नाचताना दिसतोय असे कॅप्शन ट्रोलरने लिहिले आहे.

करण जोहरने ट्विटर केलंय डिलीट

विशेष म्हणजे करणने एक महिन्यापुर्वीच ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे. ट्रोलर्स ला कंटाळूनच त्याने ट्विटर सोडल्याची चर्चा आहे. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा हवी असं म्हणत त्याने ११ ऑक्टोबर ला ट्विटर ला रामराम केला. करणने जरी ट्विटर सोडले असले तरी ट्रोलर्स ने काही त्याची पाठ सोडलेली दिसत नाही.

टॅग्स :करण जोहर