Join us

दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 05:30 IST

या दोघांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या लेकीसोबत घराची पाहणी केली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बॉलिवूडमध्ये ‘शोमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांच्या वांद्रे पाली हिल येथील ‘कृष्ण राज’ या बंगल्याचा पुनर्विकास होत आहे. या जागी उभ्या राहणाऱ्या टोलेजंग टॉवरमधील पाच मजल्यांच्या घरात रणबीर कपूर आणि त्याची पत्नी अभिनेत्री आलिया भट हे दिवाळीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या दोघांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या लेकीसोबत घराची पाहणी केली. राज कपूर यांच्या ऐतिहासिक बंगल्याचे पाडकाम करत त्या जागी आलिशान इमारत उभारली जात आहे. याच इमारतीमध्ये रणबीर आणि आलिया यांना पाच मजल्याचे घर मिळाले आहे. 

अंतर्गत सजावटीचे काम अंतिम टप्प्यात...

या घराचे बहुतांश काम झाले असून अंतर्गत सजावटीचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हे कुटुंब नव्या या पाच मजल्याच्या उभ्या बंगल्याला ते ‘राहा’ हे आपल्या मुलीचे नाव देणार असल्याची देखील माहिती आहे. दोन वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीचे काम सुरू असल्यामुळे सध्या आलिया आणि रणबीर हे या इमारतीच्या जवळच असलेल्या ‘वास्तू’ नावाच्या इमारतीमध्ये राहात आहेत. या इमारतीमध्ये बॉलिवूडमधील काही प्रमुख निर्माते व कलाकारांनी देखील फ्लॅटची खरेदी केली आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटसुंदर गृहनियोजनमुंबई