रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भटच्या (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) या बहुचर्चित सिनेमातील ‘केसरियां’ (Kesariya song) या गाण्याची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत होते. आलिया व रणबीरच्या लग्नावेळी या गाण्याचा टीझर रिलीज झाला होता आणि तेव्हापासून हे गाणं कधी एकदा रिलीज होतं, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर काल हे गाणं रिलीज झालं आणि रिलीज होताच ट्रेंड करू लागलं. काही लोकांना हे गाणं प्रचंड आवडलं. पण काही लोकांनी मात्र गाण्यातील काही शब्दांवरून ‘केसरियां’ची खिल्ली उडवणं सुरू केलं. होय, सोशल मीडियावर ‘केसरियां’वरचे एक ना अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. (Kesariya Song Memes)
गाण्यातील एका छोट्याशा पार्टमुळे नेटकऱ्यांनी ‘केसरियां’ची चांगलीच मजा घेतली. ‘काजल की सियाही से लेखी है तुने न जाणे कितनी लव्ह स्टोरीया’ ही ओळ अनेकांना खटकली. विशेषत: ‘लव्हस्टोरीया’ हा शब्द जास्त खटकला आणि यावरून लोकांनी गाण्याची खिल्ली उडवणं सुरू केलं. मग काय? सोशल मीडियावर जणू मीम्सचा पूर आला.
केसरिया सॉंग अशा नावाने एक हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे. तसंच अनेक मीम पेज याचा फायदा घेऊन इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.
काहींच्या मते, गाण्यातील इंग्रजी शब्दांनी ‘केसरियां’ची सगळी मजा घालवली. गाण्याचा टीझर एकदम आवडला होता पण पूर्ण गाणं ऐकून निराशा झाल्याच्या भावना अनेकांनी या मीम्समधून व्यक्त केल्या आहेत. एकंदर काय तर काही ओळींचं कसं बसं जुळवून आणलेलं यमक काहींना पसंत पडत नसल्याचं दिसून येत आहे.
‘केसरियां’ या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्यने लिहिलं आहे. अरिजीत सिंगने हे गाणं गायलं आहे. या गाण्याचं साऊथ हर्जन सिद श्रीराम या गायकाने गायलं आहे. संपूर्ण गाणं इशा आणि आर्यन यांच्यावर चित्रीत आहे. या दोघांची वाराणसीमध्ये फुलणारी कलरफुल लव्हस्टोरी गाण्यात दाखवण्यात आली आहे.