Join us

रणबीर कपूर-आलिया भटला मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 8:48 AM

रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमात श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे.

बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि पत्नी आलिया भट (Alia Bhatt) यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचं आमंत्रण मिळालं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आलं आहे. आरएसएस चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री सुनील आंबेकर, आरएसएस कोंकण प्रांताचे प्रचार प्रमुख श्री अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांनी हे आमंत्रण पत्र रणबीर-आलियाला सुपुर्त केलं.

अक्षय कुमार, कंगना रणौत, अनुपम खेर, सनी देओल, प्रभास, अमिताभ बच्चन यांसह अनेक कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी आमंत्रण मिळालं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी हा भव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात आधी आमंत्रण मिळालं आहे. आता रणबीर-आलियाचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये ते आमंत्रण पत्र स्वीकारताना दिसत आहेत. 

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीचाच मुहूर्त का? जाणून घ्या कारण

रणबीर कपूर आगामी 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार अशी चर्चा आहे. 'दंगल' फेम नितेश तिवारी सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. यामध्ये आलिया भटच्या नावाचीही चर्चा होती मात्र सीतेच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेत्रीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. शिवाय रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत दिसलेले अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही आमंत्रण मिळालं आहे.

दोन तासांची पूजा, पंतप्रधान मोदींचे भाषण... प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नियोजन जाणून घ्या

या भव्य उद्घाटनसोहळ्याआधी १६ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रम सुरु होतील. 4 हजार साधुसंतसह ७ हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटराम मंदिरअयोध्या