Join us

रणबीर-आलिया लग्न बंधनात; नवदाम्पत्याच्या फोटोंवर एक्स गर्लफ्रेंड कतरिना अन् दीपिका म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 9:42 AM

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न बंधनात; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आलियानं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट्स

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट विवाह बंधनात अडकले आहेत. मिस भट्ट आता मिसेस कपूर झाली आहे. नवदाम्पत्याचा फोटो पाहण्यासाठी अनेकजण आतुर झाले होते. लगीनगाठ बांधल्यानंतर आलियानं रणबीरसोबतचे फोटो शेअर केले. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत, सगळ्यांनीच नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. 

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या नवदाम्पत्याला अभिनेत्री दीपिका पादुकोण, कतरिना कैफ कशाप्रकारे शुभेच्छा देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. दीपिका आणि कतरिना या दोघीही रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे या दोघी रणबीर आणि आलियाच्या फोटोंवर काय कमेंट करतात याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. 

दीपिका पादुकोननं रणवीर आणि आलियाला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 'तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि हास्य कायम राहो, अशी कामना करते,' अशा शब्दांत दीपिकानं नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. पुढे तिनं लाल रंगाचा हार्ट इमोजीदेखील वापरला. आलियानं शेअर केलेल्या फोटोंवर कतरिना कैफनंदेखील कमेंट केली. 'लग्नाबद्दल तुम्हा दोघांचं अभिनंदन. खूप खूप प्रेम आणि आनंद,' अशा शुभेच्छा देत कतरिनानं पुढे तीन हार्ट इमोजी वापरले आहेत.

रणबीर कपूरनं सर्वात आधी दीपिका पादुकोनला डेट केलं. २००७ पासून डेटिंगला सुरुवात झाली. बचना ए हसीनो चित्रपटात दोघांनी काम केलं. दीपिकानं रणबीरच्या नावाचा टॅटूही काढला होता. मात्र कतरिनामुळे दोघांचं नातं तुटलं. राजनिती चित्रपटाच्या चित्रिकरणामुळे रणबीर आणि कतरिनाची जवळीक वाढली. दीपिकासोबत नात्यात असताना रणबीर कतरिनाच्या जवळ जात होता. दीपिकानं त्याला रंगेहात पकडलं. त्यानंतर दीपिकानं नातं तोडलं. यानंतर रणबीर आणि कतरिना लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. 

टॅग्स :रणबीर कपूररणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठदीपिका पादुकोणकतरिना कैफआलिया भट