Join us

Ranbir आणि Alia साठी सूरतहून आले सोन्याचे गुलाब, कुणी पाठवलं इतकं महागडं गिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:01 PM

Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding : रणबीर कपूरच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये ज्वेलर्स द्वारे पाठवण्यात आलेलं गिफ्ट बघू शकता.

Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाचे रितीरिवाज सुरू झाले आहेत. कपलच्या या खास दिवसासाठी त्यांचे मित्र आणि कुटुंबिय एकत्र येत आहेत. पाहुण्यांसोबतच घरात भेटवस्तूही पोहोचत आहेत. सूरतच्या एका खास ज्वेलर्सने आलिया आणि रणबीरसाठी खास गिफ्ट पाठवलं आहे.

रणबीर कपूरच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये ज्वेलर्स द्वारे पाठवण्यात आलेलं गिफ्ट बघू शकता. व्हिडीओमध्ये एक गोल्ड प्लेटेड बुके हातात घेऊन एक व्यक्ती दिसत आहे. ट्विटनुसार, रणबीर आणि आलियासाठी हे गिफ्ट सूरतच्या एका ज्वेलरने पाठवलं आहे. 

या व्यक्तीने सांगितलं की, आम्ही सूरतहून आलो. हे रणबीरजी आणि आलियाजीसाठी गिफ्ट आहे. हा गोल्ड प्लेटेड रोज बुके आहे. जो गोल्डने फॉयल केलेला आहे. हे १०० टक्के रिअर आहे. या व्यक्तीने त्याचं नाव रौनक सांगितलं. त्याने हे नाव पाठवणाऱ्यां नावही सांगितलं. ते कुशल भाई ज्वेलर्स असं आहे. सोन्याचा हा बुके फारच शानदार आहे.

रिपोर्ट्सनुसार रणबीर कपूर आपली पत्नी आलियालाही महागडे गिफ्ट देणार आहे. त्याने आलियासाठी ८ डायमंड असलेला बॅंड बनवला आहे. ८ डायमंड असण्यामागे रणबीर लकी नंबर ८ आहे. रणबीरने स्वत:हे डायमंड सिलेक्ट केलेत. जे त्याने इंटरनॅशनल ब्रॅन्ड वॅन क्लीफ अॅन्ड आर्पेल्सकडून घेतले आहेत. तर रणबीरच्या जवळच्या मित्राने सांगितलं की, त्याने आलियासाठी कस्टम मेड रिंग बनवली आहे.

१३ एप्रिल सकाळपासूनच लग्नाचे रितीरिवाज सुरू झाले आहेत. याची सुरूवात गणेश पूजनाने केली. त्यानंतर २ वाजता मेहंदी सेरमनी सुरू झाली. चर्चा आहे की, कपल १४ एप्रिलला सात फेरे घेतील. काही रिपोर्ट्समध्ये ते १५ एप्रिलला लग्न करणार आहे. दुसरीकडे वेडिंग रिसेप्शनसाठी ताज महल हॉटेल बुक केलं आहे. इथे १६ आणि १७ तारखेला रिसेप्शन होईल. 

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भट