Join us

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 11:17 IST

Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे.

बॉलिवूडची स्टार जोडी रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि आलिया भट्ट (alia bhatt)  हे दोघंही त्यांच्या अभिनयासह लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असतात. अलिकडेच या जोडीने एप्रिल महिन्यात एक लक्झरी कार खरेदी केली होती. या महागड्या गाडीनंतर त्यांनी पुन्हा एक नवीन कार खरेदी केली आहे. त्यामुळे ही जोडी सध्या चर्चेत आली आहे.

एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यांच्या या गाडीची नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर या जोडीने पुन्हा एकदा ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या गाडीची किंमत थक्क करणारी आहे.

रणबीरने खरेदी केली ब्रँड न्यू कार

रणबीर-आलियाने लेक्सस एलएम (Lexus LM) ही नवीन गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तब्बल २.५० कोटी रुपये इतकी आहे. सोमवारी या जोडीने त्यांची नवीन कार घरी आणली. रणबीरला गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याचा गाड्यांच्या ताफ्यात अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.  रणबीरकडे लँड रोवर रेंज रोवर ऑटोबायोग्राफी, ऑडी A8 L, मर्सिडीज-एएमजी जी 63 ,ऑडी R8 या गाड्यांचा समावेश आहे.

टॅग्स :बॉलिवूडरणबीर कपूरआलिया भटसेलिब्रिटी