रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भट ( Alia Bhatt ) सध्या जाम खुश्श आहेत. कारण आहे ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा. ‘बायकॉट बॉलिवूड’चा ट्रेंड, निगेटीव्ह कमेंट्स, टीका असं सगळं काही असताना रणबीर व आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ने बक्कळ कमाई केली. ‘ब्रह्मास्त्र’चं रणबीर व आलियानं जोरदार प्रमोशन केलं. अगदी प्रेग्नंट असतानाही आलिया प्रमोशनसाठी देशभर फिरली. मुलाखती, फोटोसेशन असं सगळं झालं. पण आता ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन संपलंय आणि कपल आपल्या पर्सनल लाईफमध्ये बिझी झालं आहे. अशात दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी रणबीर व आलियाला ट्रोल करायला सुरूवात केली.नुकताच करिना कपूरचा वाढदिवस झाला. या बर्थ डे सेलिब्रेशनला आलिया व रणबीर दोघंही हजर होते. पार्टी संपल्यावर दोघंही बाहेर आलेत. साहजिकच पापाराझींचे कॅमेरे सरसावले. पापाराझींनी दोघांना पोझ देण्याची विनंती केली. पण आलिया व रणबीरने या विनंतीकडे दुर्लक्ष करत, आपल्या गाडीतून निघून गेले.
आलिया व रणबीरची नेमकी हीच गोष्ट चाहत्यांना खटकली. ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनच्या वेळी पापाराझींना वाट्टेल तितक्या पोझ देणाऱ्या आलिया -रणबीरने प्रमोशन संपताच पापाराझींकडे दुर्लक्ष करणं चाहत्यांना आवडलं नाही. मग काय, अनेकांनी दोघांना फैलावर घेतलं.‘मुव्ही आयी, पैसा हजम, अब भाव देना बंद, अब अॅटिट्यूड शुरू,’ अशा शब्दांत एका युजरने आपला संताप बोलून दाखवला. इतका अॅटिट्यूड, असं एका युजरने लिहिलं.
अनेकांनी अशा संधी व गर्विष्ठ लोकांचे फोटो घेणेच बंद करा, असा सल्ला पापाराझींना दिला. क्यों इन घमंडीयों के पिछे पडे रहते हो भाई, जो भाव नहीं देते उनके पिछे भागना ही क्यों?अशी कमेंट एका युजरने आलिया व रणबीरचा हा व्हिडीओ पाहून केली.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट 9 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया-रणबीरने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, साऊथ स्टार नागार्जुन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले.