रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्या दोघांच्या लग्नासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. अशातच या सेलिब्रिटी वेडींगला वऱ्हाडी मंडळींपेक्षा बाऊन्सर्सचीच गर्दी जास्त असणार असल्याची माहिती मिळते आहे. लग्न सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घेत आलियाचा सावत्र बंधू राहुलने २०० बाऊन्सर्सची नेमणूक केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
युसूफभाईंच्या द ९/११ सिक्युरीटी एजन्सीकडे रणबीर-आलियाच्या लग्न सोहळ्याच्या सुरेक्षची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याखेरीज राहुलच्या टिममधील काही जण चेंबूरमधील आरके स्टुडिओ आणि वास्तूवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहेत. याखेरीज पाहुण्यांसोबत रोमिंग पेट्रोलिंग पोलिस असतील असेही समजते आहे. हा लग्नसोहळा नक्की कधी होणार याबाबत संभ्रमाचं वातावरण असले तरी हे लग्न १४ एप्रिललाच संपन्न होणार आहे. त्यानुसार १३ एप्रिलला मेहंदी सोहळा असून, १४ एप्रिलला सकाळी हळदी समारंभ असेल. हे सर्व सोहळे रणबीर-आलियाचे कुटुंबीय, अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. विवाहासाठी सब्यसाची यांनी बनवलेला वेडींग गाऊन आणि मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला दुपट्टा आलिया परिधान करणार आहे.