रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफने ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी कधीच आपल्या ब्रेकअपचे कारण मीडियात सांगितलेले नाही. जग्गा जासूस या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान ते दोघे एकत्र दिसले होते. मात्र त्यानंतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र उपस्थिती लावली नाही. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या मुंबईमधील रिसेप्शनला ते एकमेकांच्यासमोर आले होते. पण त्या दोघांनी एकमेकांसोबत बोलणे टाळले होते. रणबीर आणि कतरिना एकमेकांना टाळत असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक महिन्यांपासून मीडियात येत आहेत. पण आता एका प्रोजेक्टच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले आहेत.
रणबीर कपूर सध्या आलिया भटसोबत नात्यात असून ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसत आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देखील ते दोघे एकत्र गेले होते. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे तर कतरिना सध्या सिंगल असून ती तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे.
आता प्रसिद्ध गायक बादशहाच्या एका गाण्यासाठी ते दोघे नुकतेच एकत्र आले होते. या गाण्याच्या सेटवरचा त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत रणबीर आणि कतरिना दोघेही हसताना आपल्याला दिसत आहेत. रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांना त्यांच्या हा फोटो प्रचंड आवडत आहे.
दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरला कतरिना कैफची साथ मिळाली होती. तर दीपिकाला रणवीर सिंगची. मात्र रणबीर आणि कॅटचे नातं सहा वर्षानंतर संपुष्टात आले. सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना रणबीरच्या जवळ आली होती. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जाते.