‘रणबीर दाल चावल टाईप सिंपल लडका है. कोई हाई मेंटेनेंस टाईप लडका नहीं. इसलिए वह कोई हाई प्रोफाईल व हाई लाईफस्टाईलवाली पत्नी संभाल नहीं पाएगा...’, हे शब्द तुम्हाला आठवत असतीलचं. हे शब्द आहेत रणबीर कपूरची (Ranbir Kapoor ) आई नीतू सिंग यांचे. रणबीरचं लग्न होण्याआधी नीतू असं म्हणाल्या होत्या. अखेर झालंही तसंच. रणबीरला साजेशी ‘दाल चावल टाईप सिंपल लडकी’ नीतू कपूर यांना सून म्हणून मिळाली. साहजिकच त्या खुश्श आहेत. रणबीरलाही ‘आमटी भात’चं महत्त्व आताश: कळलं आहे. होय, आलिया भट (Alia Bhatt) सारखी बायको मिळाल्यावर तो सुद्धा खुश्श आहे. अशात आता हक्का नुडल्स हवेत कुणाला?
आज रणबीरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच ( Shamshera Trailer Launch) झाला. या इव्हेंटमध्ये रणबीर बायको आलियाबद्दल भरभरून बोलला.
ती माझी वरण-भात...इव्हेंटमध्ये रणबीरनं आलियाचं भरभरून कौतुक केलं. आलियासोबत लग्न ही माझ्या आयुष्यातली एक सुंदर गोष्ट आहे. ‘शादी एक दाल चावल की तरह है. लाइफ में थोड़ा टंगडी कबाब, कीमा पाव, हक्का नूडल्स होना चाहिए. लेकिन बॉस जिंदगी के तजुर्बे के बाद दाल चावल ही बेस्ट है’, असा माझ्याच सिनेमातला एक डायलॉग आहे. लग्नानंतर मलाही हे पटलं आहे. आलिया ही माझी वरण भात आहे. वो दाल चावल में तडका है, अचार है, कांदा है, सब कुछ है...तिच्यापेक्षा चांगली बायको असूच शकत नाही, असं रणबीर यावेळी म्हणाला.
हा बायकोचा पायगुण...
रणबीरचे शमशेरा आणि ब्रह्मास्त्र असे एकापाठोपाठ एक सिनेमे रिलीज होणार आहेत. हा आलियाा पायगुण आहे का? असा प्रश्न विचारल्यावर रणबीर हसला. ‘हा बायकोचा पायगुण असं तुम्ही म्हणू शकता. कारण माझ्या हातात काहीच नव्हतं. हे दोन्ही मोठ्या बजेटच्या सिनेमे आहेत. म्हणून खूप वेळ लागला. त्यात मध्ये कोविड आला. मला कळत नाही, हे चांगलं की वाईट, पण माझे दोन्ही सिनेमे 45 दिवसांत रिलीज होत आहेत आणि याचा मला आनंद आहे, असं तो म्हणाला.