Join us

Ranbir Kapoor, Alia Bhatt : “माझी मुलगी आलियासारखी अजिबात व्हायला नको”, असं का म्हणाला रणबीर कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:54 IST

Ranbir Kapoor, Alia Bhatt : होय, राहा आलियासारखी होऊ नये, असं रणबीरला वाटतंय आणि त्याचं कारणही त्याने सांगितलं आहे.

रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) हा सिनेमा आज रिलीज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. यादरम्यान रणबीरने मुलाखतींचा धडाका लावला होता. प्रत्येक मुलाखतीत तो लेक राहाबद्दल भरभरून बोलताना दिसला.  राहाचं हसणं एकदम जादुई आहे. तिच्यामुळे घरातून पाय निघत नाही, असं तो म्हणाला. राहा आलियासारखीच (Alia Bhatt) सुंदर व्हावी, अशी त्याची इच्छा आहे. पण एकाबाबतीत मात्र आपली लेक बायकोवर जायला नको, हे त्याचं स्पष्ट मत आहे. होय, राहाने अजिबात आलियावर आईवर जाऊ नये, असं त्याला वाटतं. अलीकडे एका मुलाखतीत त्याने यामागचं कारणही सांगितलं.

राहा माझ्यासारखी व्हावी. आई आलियासारखी अजिबात नाही, असं रणबीर म्हणाला. त्याचं हे वाक्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण रणबीरने लगेच यामागच्या कारणाचा खुलासा केला. तो म्हणाला, राहा आलियासारखी सुंदर व्हावी, अशी माझी इच्छा आहे. कारण आलिया खूप सुंदर आहे. पण तिचा स्वभाव तिच्या बाबासारखा म्हणजेच माझ्यासारखा व्हावा, असं मला वाटतं. ती आलियावर गेली तर घरात दोन दोन मुली सांभाळणं मला कठीण होईल. आलिया खूपच तेज आहे. फारच बडबडी आहे. राहा सुद्धा तशीच झाली तर मी दोघींना हँडलच करू शकणार नाही. त्यामुळे राहा माझ्यासारखी शांत व्हावी, असं मला वाटतं.

रणबीर कपूरने एप्रिल २०२२ मध्ये आलिया भटशी लग्न केलं. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एका क्यूट मुलीला जन्म दिला. दोघंही सध्या राहाचं बालपण एन्जॉय करत आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटबॉलिवूड