Join us  

'यांना' दिले रणबीर कपूरने 'संजू' चित्रपटाच्या यशाचे श्रेय..समोर आला पार्टीतील व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 1:36 PM

रणबीर कपूर सध्या संजूचे सक्सेस एन्जॉय करतोय. संजू बायोपिकसाठी रणबीरने अथक परिश्रम घेतले आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत.

ठळक मुद्देसंजय दत्तच्या आयुष्यातील विविध पैलू या चित्रपटात उलगडण्यात आले आहेतकाही सीन्स शूट करताना रणबीर कपूर भावूक देखील झाला होता

 

रणबीर कपूर सध्या संजूचे सक्सेस एन्जॉय करतोय. संजू बायोपिकसाठी रणबीरने अथक परिश्रम घेतले आहेत. आपली चॉकलेट बॉयची इमेज रणबीरने या भूमिकेन खोडून काढली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. प्रेक्षकांना रणबीरने साकारलेला संजू फारच भावला आहे. चार दिवसांत या चित्रपटाने 145.41 कोटींचा गल्ला जमावला आहे. संजू या वर्षातला सगळ्यात सुपरहिट चित्रपट तर आहेच मात्र बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटदेखील ठरला आहे. हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला आहे.  रणबीरच्या करिअरमध्ये सगळ्यात झटपट 100 कोटींचा गल्ला जमावणारा संजू हा पहिला चित्रपट ठरला आहे. 

नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी पार पडली. यात संजूची चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली. या पार्टी दरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो आतासमोर येतायेत. या व्हिडीओमध्ये रणबीर आपल्या चित्रपटाचे सक्सेसचे क्रेडिट संपूर्ण टीमला देताना दिसतोय. रणबीरसोबतच विक्की, परेश रावल आणि मनिषा कोईराला यांनी साकारलेल्या भूमिकांचंदेखील कौतुक करण्यात येतेय. आमिर खान, करण जोहर, मेघना गुलजार यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्वीट करुन कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांचे कौतुक केले होते. 

 

 

 

 

 

 

 

 

संजय दत्तच्या आयुष्यातील विविध पैलू या चित्रपटात उलगडण्यात आले आहेत. काही सीन्स शूट करताना रणबीर कपूर भावूक देखील झाला होता. शूटिंगच्या दरम्यान संजय दत्त स्वत सेटेवर गेला आहे.  रणबीरने ही भूमिका साकारण्यासाठी वजन देखील वाढवले. रणबीरने संजूसाठी घेतलेली मेहनत फळाली आणि रणबीरच्या करिअरला पुन्हा एकदा उभारी मिळाली आहे. आपल्या अभिनयच्या जोरावर रणबीरने अनेकांची मनं जिंकली आहेत. संजू पाहाताना तुम्हाला त्यात रणबीर कपूर भूमिका साकारतो आहे याचा विसर पडतो आमि खरंतर हेच त्याचे श्रेय आहे असे म्हणावे लागले.

टॅग्स :संजू चित्रपट 2018रणबीर कपूर