Join us  

ब्रेकअप विसरून रणबीर कपूर, कॅटरिना कैफने केले ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 2:57 PM

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच ब्रेक अप झालेल्या कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे जोडपे पुन्हा एकत्र येणार नाहीत, ...

‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळीच ब्रेक अप झालेल्या कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे जोडपे पुन्हा एकत्र येणार नाहीत, असेच काहीसे तर्क-वितर्क लावले जात होते. शिवाय या चित्रपटाच्या प्रमोशनलाही हे दोघे एकत्र येणार नसल्याचे बोलले जात होते. परंतु आता या दोघांनी मागचा दुरावा विसरून पुन्हा एकदा एकत्र येत धूम उडवून दिली आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आलेल्या या दोघांनी असा काही जलवा दाखविला की, त्यांच्यात कधी-काळी ब्रेकअप झालेच असेच काहीसे चित्र दिसत होते. काही दिवसांपूर्वीच हे दोघे चित्रपटातील ‘गलती से मिस्टेक’ या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी एकत्र आले होते. सुरुवातीला दोघांमध्येही दुरावा असल्याचे स्पष्टपणे दिसत होते; मात्र हळूहळू दोघे खुलत गेले अन् त्यांच्यातील दुरावा बाजूला ठेवून त्यांनी प्रमोशनला प्राधान्य दिले. यावेळी कॅटरिनाने एक्स बॉयफ्रेण्ड असलेल्या रणबीरसोबत सेल्फीही काढला होता. शिवाय दोघांमधील संवाद बघून त्यांच्यात पुन्हा एकदा सर्व काही आलबेल होत असल्याचे जाणवत होते. असो, सध्या दोघांनी प्रमोशनला सुरुवात केली असून, त्यांच्यातील केमिस्ट्री जबरदस्त दिसून येत आहे. शिवाय ते पुन्हा एकदा प्रेमात तर पडले नाहीत ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यास वाव मिळत आहे. त्याचबरोबर दोघेही डान्स रिहर्सलचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी एकप्रकारे सुखद दिलासाच मिळत आहे. एका व्हिडीओमध्ये तर कॅटरिना रणबीरच्या गालावर चापट मारत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे दोघांना बघून विश्वासच बसत नाही की, यांच्यात ब्रेकअप झाले आहे. नुकतेच हे दोघे एका खासगी रेडिओ कार्यालयात त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी दोघांनी आर जेसोबत चांगलीच मस्ती केली. ब्रेकअपनंतर दोघांचा हा चित्रपट त्यांच्या करिअरच्यादृष्टीने खूपच महत्त्वाचा समजला जात आहे. खरं तर जेव्हापासून या दोघांनी हा चित्रपट साइन केला तेव्हापासून त्यांच्यात काही ना काही खटके उडत होते. अखेर शूटिंगदरम्यानच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे पुढील शूटिंगसाठी अनंत अडचणी आल्या होत्या. आता हा चित्रपट जुलैमध्ये रिलीज होणार आहे.