Join us

अशा माणसाशी लग्न करू नकोस...! रणबीरचं वागणं पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का, आलियाला दिला सल्ला   

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:21 PM

आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास काय तर आलिया व रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.

आलिया भट  (Alia Bhatt) व रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. आता काही कारणास्तव हे लग्न वर्षभर लांबणीवर पडल्याचं कळतंय. तूर्तास काय तर आलिया व रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.व्हिडीओ तसा जुना आहे. पण तो व्हायरल होताच नेटकरी खवळले आहेत. अनेकांनी तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आलियाला रणबीरशी लग्न करू नकोस, असा सल्ला दिला आहे. आता या व्हिडीओत असं काय आहे तर यात रणबीर आलियाचा लहंगा पायानं हटवताना दिसतोय.

दिवाळीदरम्यान काली पूजेदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. आलिया व रणबीर दोघंही स्टेजवर येतात. फोटोग्राफर्सला पोझ देतात. फोटोसेशननंतर स्टेजवरून खाली उतरत असताना आलिया समोर असते तर रणबीर तिच्या मागे. यादरम्यान स्टेजच्या पायऱ्यांवर आलियाचा लहंगा घोळतो. तो रणबीरच्या पायात अडकतो आणि मग रणबीर तो हाताने बाजूला करण्याऐवजी पायाने उडवतो. नेमकी हीच गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे.हा व्हिडीओ एका युट्यूब चॅनलने शेअर केला आहे आणि लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

 ‘रणबीर आलियाचा किती आदर करतो, हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. एका युजरने रणबीरला सल्ला देत, ‘तू रिलेशनशिपमध्ये असो वा नसो, पण  कोणत्याही महिलेच्या कपड्यांसोबत असं करू नकोस,’अशी कमेंट केली आहे. एका युजरने ‘खूप वाईट निवड आहे तुझी आलिया,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. जबरदस्तीवाला लव्ह, अशी कमेंट एका युजरनं केली आहे. आलिया याच्याशी अजिबात लग्न करू नकोस, तो कुणाचाच आदर करत नाही, असं एका युजरनं लिहिलं आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट