६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ला 'ॲनिमल' (Animal Movie) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून आता रणबीरचे चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत रणबीरने चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्याने नेटफ्लिक्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाच्या निर्मितीदरम्यानही त्याच्या कथेबद्दल कोणालाही माहित नव्हते.
रणबीर कपूर म्हणाला की, 'बॉबी सरांना कथेबद्दल काहीच माहिती नव्हते. अनिल सरांना फक्त पिता-पुत्राची गोष्ट माहीत होती. संदीप त्याच्या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या स्क्रिप्टबद्दल खूप गुप्त होता. तथापि, त्याने मला त्याच्या दुसऱ्या भागातील 'ॲनिमल पार्क'ची एक-दोन दृश्येही कथन केली आहेत आणि ती दृश्ये खूपच रोमांचक आहेत. आता संदीपला त्याच्या दुसऱ्या भागाबद्दल पूर्ण विश्वास आहे आणि तो या भागाला अधिक जटिल आणि मोठ्या स्तरावर डार्क बनवणार आहे.
'काही चुकत असेल तर ते दाखवणंही महत्त्वाचं'याच मुलाखतीत रणबीरने असेही सांगितले की, या चित्रपटाला अनेक लोकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी या चित्रपटाने समाजात हेल्दी संवादाला सुरुवात केली आहे. रणबीर म्हणाला, 'विषारी पुरुषत्वाबाबत अतिशय हेल्दी वादविवाद सुरू झाले आहेत आणि सिनेमासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण किमान सिनेमात संवाद सुरू होतो. एखादी गोष्ट चुकीची असेल आणि ती चुकीची आहे हे तुम्ही दाखवून दिले नाही किंवा त्यावर समाजात चर्चा सुरू होईपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही.
''प्रेक्षक म्हणून ठरवायचे,काय चूक आहे'' अभिनेता पुढे म्हणाला, 'म्हणून आपण ज्या भूमिका साकारत आहोत ते पात्र आहेत. एक अभिनेता म्हणून आपण अशा पात्रांबद्दल सहानुभूती बाळगतो कारण आपल्याला ती भूमिका करायची असते. पण एक प्रेक्षक म्हणून तुम्ही ठरवायचे आहे की काय चूक आहे? तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर चित्रपट बनवू शकता आणि तो बनवला पाहिजे. कारण या लोकांवर चित्रपट काढला नाही तर समाज कधीच सुधारणार नाही.