रणबीर कपूर हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. रणबीर कपूरने गेल्या अनेक वर्षांपासून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. रणबीर कपूरचे मागील दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आहेत. 'अॅनिमल' आणि 'ब्रम्हास्त्र' अशा दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांंचा चांगला प्रतिसाद मिळालाय. रणबीर कपूरने अलीकडेच निखिल कामथ यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने राहाच्या जन्मानंतर कोणती सवय कायमची बंद केली याचा खुलासा केला.
रणबीरने 'ही' वाईट सवय कायमची सोडली
रणबीरने या मुलाखतीत सांगितलं की, "मला मृत्यूची कधीच भीती वाटली नाही. मला कायम वाटत आलंय की मी वयाच्या ७१ व्या वर्षी जगाचा निरोप घेईल. कारण ८ अंकाने कायम माझं मन व्यापून टाकलंय. याशिवाय मला असंही वाटतं की मी आणखी फक्त ३० वर्ष जगेल. पण राहाच्या जन्मानंतर माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मी वयाच्या १७ व्या वर्षापासून सिगारेट ओढत असे. पण राहा आयुष्यात आल्यावर मी गेल्यावर्षी सिगारेट ओढणं पूर्णपणे बंद केलंय."
लेकीसाठी रणबीर निरोगी राहणार
रणबीरने या मुलाखतीत पुढे वक्तव्य केलं की, "राहाच्या जन्मानंतर मला जबाबदारीची जाणीव झाली. त्यानंतर मी निरोगी राहण्याकडे लक्ष देऊ लागलो. बाबा झाल्यावर मी स्मोकिंग बंद केलं. गेली अनेक वर्ष मला ही सवय होती. पण आता आणि यापुढेही मी स्मोक करणार नाही." असं रणबीर म्हणाला. रणबीर लवकरच 'अॅनिमल पार्क', 'ब्रम्हास्त्र २' आणि 'रामायण' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.