मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाला प्रेक्षकांनी हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही. आमिर खान देशाच्या विविध भागात या चित्रपटाचे प्रमोशन केलं. मात्र, या चित्रपटाला सोशल मीडियावर प्रचंड विरोध झाला असून सोशल मीडिया यूजर्स चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. त्यासाठी, बायकॉट लाल सिंग चढ्ढा हा ट्रेंडही चालविण्यात आला. त्यानंतर, अनेक सिनेस्टार्सने यावर आपलं मत मांडलं. आता, अभिनेता रणबीर कपूरनेही बायकॉटवर भाष्य केलं आहे.
आमिर खानने लोकांना प्रत्येक वेळी चित्रपट पाहण्याची विनंती केली. मात्र, नेटीझन्सने आमीरला विरोध करत चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच ट्रेंड चालवला. त्यानंतर, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूचा दोबारा हा चित्रपटही फ्लॉप झाला. या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे, बायकॉटचाच हा परिणाम असल्याची चर्चा पुन्हा रंगली. ओटीटीच्या जमान्यात बायकॉट ट्रेंडवरुन आता बॉलिवूड कलाकार मत व्यक्त्त करत आहेत. अभिनेता रणबीर कपूरनेही आपलं मत मांडलं आहे. प्रेक्षकाला कोणीही प्रश्न विचारू शकत नाही, असे रणबीरने म्हटले.
रणबीरचा ब्रह्मास्त्र हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र, सध्या ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ हा ट्रेंड काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागला आहे. त्यासंदर्भात एका प्रश्नावर विचारल्यानंतर रणबीरने आपल मत मांडलं.
‘जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा उत्कंठासोबतच भीतीची भावना देखील असते. विशेषत: अशा चित्रपटासाठी कारण तो बनवण्यासाठी आम्ही खरोखरच आमचे आयुष्य दिलेले असते. त्यामुळे दबाव अधिक आहे. आम्ही प्रेक्षक हाच राजा मानतो. त्याला कोणी प्रश्न विचारू शकत नाही’. ४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार ब्रह्मास्त्र
“चित्रपट जागतिक बनतो ते यातील कन्टेन्टमुळे. आम्हाला साथ देणारे अनेक लोक आहेत. राजामौली सर हा चित्रपट चार दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करत आहेत. आमचा विश्वास आहे की आम्ही एक चांगला चित्रपट बनवला आहे आणि आशा आहे की प्रेक्षकांना या आशयाचा आनंद मिळेल.”