Join us

"मी त्या लोकांबरोबर आहे जे...", आलियाच्या लिपस्टिक विधानावर रणबीरने सोडलं मौन, 'टॉक्झिक पती' म्हणून अभिनेत्याला केलेलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:02 AM

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने रणबीर कपूरबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर रणबीरला टॉक्झिक पती असं म्हणत ट्रोल करण्यात आलं होतं. आता रणबीरने टॉक्झिक पती म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 'सांवरिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या रणबीरने नंतर अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांचा मुलगा असलेल्या रणबीरला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. स्टारकिड असलेल्या रणबीरने मात्र अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्याने 'संजू', 'ये जवानी है दिवानी', 'बर्फी', 'ब्रह्मास्त्र' अशा ब्लॉकबस्टर चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडली. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टनेरणबीर कपूरबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर रणबीरला टॉक्झिक पती असं म्हणत ट्रोल करण्यात आलं होतं. 

 आलियाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने रणबीरला लिपस्टिक लावलेली आवडत नसल्याचं सांगितलं होतं. लिपस्टिक लावली असेल,  तर रणबीर ती काढायला लावतो, असा खुलासा आलियाने केला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या  व्हिडिओमुळे रणबीरला ट्रोल करण्यात आलं होतं. आता रणबीरने टॉक्झिक पती म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. "जर तुम्ही कलाकार आहात आणि काम करत आहात, तर नकारात्मकता गरजेची आहे. समतोल साधण्यासाठी सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टींची गरज असते," असं रणबीर म्हणाला. 

पुढे तो म्हणाला, "कधी कधी एक अभिनेता असल्यामुळे तुमच्याबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जातात. पण, त्या सगळ्याच खऱ्या असतील असं नाही. चित्रपटांत मी साकारलेल्या भूमिका आणि मीडियामुळे माझी जी प्रतिमा बनवली गेली आहे, ती खरी नाही. मी असा नाहीये. ही प्रतिमा लोकांनी बनवलेली आहे. मी जोपर्यंत एक अभिनेता म्हणून स्वत:ला सिद्ध करत आहे. तोपर्यंत त्यांना माझ्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे." 

आलियाने सांगितलेल्या लिपस्टिकच्या गोष्टीबद्दल रणबीर म्हणाला, "नुकतंच मी एक आर्टिकल वाचलं, ज्यात माझा उल्लेक टॉक्झिक पती म्हणून केला होता. पण, त्या लोकांबरोबर आहे जे टॉक्झिक मर्दानगीच्या विरुद्ध लढत आहेत. पण, जर त्यांना माझा चेहरा याच्यासाठी वापरायचा असेल, तर ठीक आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण, त्यांची लढाई मला या गोष्टींचं वाईट वाटून घेण्यापेक्षा खूप मोठी आहे." 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटसेलिब्रिटी