अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडमध्ये Method actor म्हणून ओळखले जाते. त्याच्या अभिनयात वेगळीच कल्पकता आहे जी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. मधल्या काळात रणबीर कपूरचे चित्रपट चालत नव्हते. त्याच्या आयुष्यात एक स्टॅग्नंसी आली होती. मात्र नंतर ब्रम्हास्त्र, Animal सिनेमामुळे त्याचं करिअर पुन्हा रुळावर आलं. रणबीर आगामी 'रामायण' सिनेमात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने सनातन धर्माविषयी वक्तव्य केलं.
निखिल कामथला दिलेल्या मुलाखतीत रणबीर म्हणाला, "माझे वडील धार्मिक होते. माझी आई सुद्धा धार्मिक आहे. वडिलांहून थोडी कमी आहे पण जेव्हा ती पूजा करायची तेव्हा बाबा खूश व्हायचे. मी लहानपणापासून त्यांना पूजापाठ करताना पाहिले आहे. त्यामुळे मीही करतो. लहानपणी मला हवं ते मिळत होतं त्यामुळे कधी देवाकडे कधी काही मागायची गरज पडली नाही. एक तो दिवस होता आणि एक आजचा दिवस आहे मी आता दररोज रात्री झोपताना देवाचे आभार मानतो."
तो पुढे म्हणाला, "जेव्हा मी उदास असायचो जसं की जर आईसोबत भांडण झालं आणि तिला वाईट वाटेल, ती रडेल असं मला काहीच बोलायचं नसतं किंवा मला वाटतंय की माझा सिनेमा हिट व्हावा किंवा मला काहीही खरेदी करायचं आहे तेव्हा सुद्धा मी देवाकडे काहीही मागायचो नाही. माझं देवासोबत कृतज्ञतेचं नातं आहे. आज मी ज्या स्टेजवर पोहोचलोय ते देवाच्या आशीर्वादामुळेच आलो आहे."
काही वर्षांपासून रणबीर सनातन धर्माबाबत वाचन करत आहे. तो म्हणाला, "माझा सनातन धर्मावर विश्वास वाढत चालला आहे. मला वाटतं गेल्या काही वर्षात मी याबद्दल इतकं वाचलंय की आता मी त्यात पूर्णपणे बुडालो आहे. हे काय आहे आणि याचा सगळ्यावर किती प्रभाव होतो हे मला कळलं आहे."