Join us

​संजूबाबाच्या बायोपिकबद्दल काय म्हणाला रणबीर कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2017 7:14 AM

संजय दत्तचे चढऊतारांनी भरलेल्या आयुष्याची कथा अखेर पडद्यावर येणार हे निश्चित झालेय. संजू बाबाचा स्टारडम ते तुरुंगापर्यंतचा  प्रवास बायोपिकच्या ...

संजय दत्तचे चढऊतारांनी भरलेल्या आयुष्याची कथा अखेर पडद्यावर येणार हे निश्चित झालेय. संजू बाबाचा स्टारडम ते तुरुंगापर्यंतचा  प्रवास बायोपिकच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट अर्थात बायोपिक देशातील तमाम युवांसाठी एक मोठा धडा असणार आहे. हे आम्ही नाही तर या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणा-या रणबीर कपूरचे मत आहे.होय, अलीकडे एका मुलाखतीत रणबीर या बायोपिकवर भरभरून बोलला. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित हे बायोपिक तुम्हाला नक्की काहीतरी शिकवून जाईल. या बायोपिकमध्ये मानवी आयुष्यातील प्रत्येक भाव-भावनांचे दर्शन घडणार आहे. एका भावूक बाप-लेकाचे  (सुनील दत्त आणि संजय दत्त) परस्परांशी असलेले संबंध, ब्रेस्ट फ्रेन्डसोबतचे नाते, आयुष्यात आलेल्या महिला, गंभीर आरोप आणि यामुळे सोसावी लागणारी मानहानी असे सगळे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट भावूक आहे, विनोदी आहे तसेच एक मोठी शिकवण देणाराही आहे. आपली चूक सुधारण्याची संधी आयुष्यात प्रत्येकाला मिळत असते. फक्त ही संधी समोर दिसताच, त्यावर तुटून पडायला हवे, असा संदेश हा चित्रपट देतो. युवकांसाठी हा चित्रपट एक मार्गदर्शक चित्रपट ठरेल, असे रणबीर म्हणाला. हा चित्रपट संजयच्या खºयाखुºया आयुष्यावर आधारित आहे. यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. संजयने स्वत:ची चूक कबुल करण्याचे धाडस दाखवले आणि त्याची किंमतही त्याला मोजावी लागली. ड्रग्जचे व्यसन, माथ्यावर दहशतवादी असल्याचा लागलेला ठपका, अयशस्वी विवाह, तुरुंगवास असे सगळे यात दिसणार आहे, असेही रणबीरने सांगितले.गत १४ जानेवारीपासून या बायोपिकचे शूटींग सुरु झाले. अलीकडे संजयने चित्रपटाच्या सेटला सरप्राईज व्हिजिट दिली. संजयला सेटवर पाहून सगळेच अवाक् झाले. यावेळी रणबीरने संजयसमोर अनेक शॉर्ट दिलेत. शिवाय संजयकडून याबदल्यात शाब्बासकीही घेतली.ALSO READ :​संजय दत्तने दिले रणबीर कपूरला सरप्राइजKoffee With Karan: ​संजय दत्तसाठी करण जोहरने केली होती चिटिंग!