Join us

Ranbir Kapoor : पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला नक्कीच आवडेल; रणबीर कपूरची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 16:36 IST

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान च्या आगामी चित्रपटाच्या यशासाठी रणबीरने पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

Ranbir Kapoor : सौदी अरेबियाच्या जेद्दाह मध्ये १ ते १० डिसेंबर रेड सी फिल्म फेस्टिव्हलचे (Red Sea Film Festival) आयोजन करण्यात आले आहे. अनेक कलाकार यामध्ये सहभागी होत आहेत. नुकतेच रणबीर कपूरने फेस्टिव्हल मध्ये हजेरी लावली.  यावेळी त्याने केलेले एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. 

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान च्या 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटाच्या यशासाठी रणबीरने पूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच रणबीरने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. 

रणबीर कपूर म्हणाला, 'कलाकाराला काम करताना कोणतीच सीमा नसते. फवादच्या आगामी चित्रपटासाठी खुप खुप शुभेच्छा. मला नक्कीच पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करायला आवडेल.' रणबीरचे हे विधान ऐकून प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.

रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' चित्रपट तुफान गाजला. आता तो लवकरच लव्ह रंजनच्या सिनेमात दिसणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरफवाद खानसिनेमा