Join us  

बॉलिवूडचा वाईट काळ? मग तुमचं तरी काय चाललंय..'BBC न्यूज' च्या पत्रकारावर रणबीरचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 1:10 PM

BBC न्यूजच्या पत्रकाराला रणबीर कपूरने दिलेलं उत्तर ऐकून हसू आवरणार नाही.

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आगामी 'तू झुठी मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने पार पडलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये रणबीरने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. सिनेमाविषयीच नाही तर इतर विषयांवरील प्रश्नांवरही रणबीरने दिलखुलास आणि हजरजबाबीपणाने उत्तरं दिली. दरम्यान बॉलिवूडच्या वाईट काळावर प्रश्न विचारताच रणबीरने पत्रकारालाच कात्रीत पकडले.

प्रेस कॉन्फरन्समध्ये रणबीर कपूरला एका पत्रकाराने विचारले, 'सध्या बॉलिवूडचा वाईट काळ...' हा प्रश्न मध्येच थांबवत रणबीर म्हणाला,'काय बोलतेस? पठाणचे कलेक्शन पाहिले नाही? तू कोणत्या पब्लिकेशनमधून आहेस ?' यावर ती पत्रकार म्हणते, 'मी बीबीसी न्यूज'. तर रणबीर हसतच म्हणतो, 'मग तर तुमचंही काहीतरी चाललंय ना आजकाल त्याचं काय आधी त्याबद्दल बोल.' 

रणबीरच्या या उत्तरावर सर्वच हसायला लागतात. यानंतर ती पत्रकार म्हणते, 'मी ते आरामात सांगेन.' तर रणबीर म्हणतो, 'मग मी देखील आरामातच सांगेन.'

रणबीर कपूरचं पत्रकारांसोबतचं हे दिलखुलास संभाषण भलतंच व्हायरल होतंय. यातून रणबीरचा हजरजबाबीपणाही दिसून येतोय. रणबीर आणि श्रद्धा कपूर सध्या 'तू झुठी मै मक्कार' सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. मात्र मेकर्सच्या स्टॅटेजीनुसार दोघेही एकत्र नाही तर वेगवेगळे प्रमोशन करताना दिसत आहेत. मार्च महिन्यात सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यातील रणबीर आणि श्रद्धाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. लव्ह रंजन यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

टॅग्स :रणबीर कपूरश्रद्धा कपूरबॉलिवूडसोशल मीडिया