आज संपूर्ण देशवासियांनी अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशभरातील साधुसंत-महंतांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी सोहळ्याला हजेरी लावली. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही या सोहळ्याचं खास निमंत्रण होतं. रणबीर कपूर-आलिया भट आणि विकी कौशल-कतरिना कैफ या दोन्ही जोड्यांनी लक्ष वेधून घेतलं. यावेळी रणबीर कपूर सेल्फी घेत असताना मागे कतरिना बसलेली दिसली असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कतरिना कैफ (Katrina Kaif) रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड आहे. दोघांचं अफेअर, ब्रेकअप आणि नंतर झालेली भांडणं तेव्हा चर्चेत होती. आज अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दोघांनी आपापल्या पार्टनरसोबत हजेरी लावली. यावेळी रणबीर आलियाच्या मागेच विकी कतरिना बसले होते. आलिया श्लोका अंबानीसोबत बोलत असताना रणबीर गुपचूप सेल्फी घेताना दिसला. तेव्हा मागे कतरिना डोक्यावर उपरणं घेऊन बसली होती. रणबीर सेल्फीत कतरिनालाही कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होता असं व्हिडिओतून दिसतं.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रणबीर कपूरची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 'रणबीरवरुन नजरच हटत नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. व्हिडिओत सुभाष घई, जॅकी श्रॉफ, आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षितही दिसत आहेत. नेटकरी व्हिडिओ पाहून पोट धरुन हसले आहेत.