Join us  

खतरनाक! 'अ‍ॅनिमल' मधील रणबीर कपूरचा Video लीक; चाहते म्हणतात, 'हा तर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 4:18 PM

रणबीर पहिल्यांदाच जबरदस्त ग्रे शेड भूमिका साकारताना दिसणार आहे.

अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आगामी 'अ‍ॅनिमल' (Animal) सिनेमाची जोरदार चर्चा आहे. चित्रपटातील रणबीरचा लुक ही समोर आला आहे. यामध्ये त्याची ग्रे शेडेड भूमिका असणार असं दिसतंय. मोठे केस, वाढलेली दाढी असा काहीसा त्याचा लुक आहे. सध्या 'अ‍ॅनिमल'चे शूटिंग सुरु असून सेटवरील एक व्हिडिओही लीक झाला आहे. व्हिडिओतील रणबीरचा लुक बघून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. 

दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी 'अ‍ॅनिमल' च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीर पहिल्यांदाच जबरदस्त ग्रे शेड भूमिका साकारताना दिसणार आहे. यामुळे त्याचे चाहतेही उत्सुक आहेत. सिनेमाचा रुग्णालयातील शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये रणबीरची झलक दिसत आहे. रुग्णालयात पेशंटच्या गाऊनमध्ये रणबीर कपूर चालत येताना दिसत आहे. त्याची एकंदर पर्सनॅलिटीच जबरदस्त दिसत आहे. He looks so giant अशी कमेंट एका युझरने केली आहे.

या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय 'अनिल कपूर', 'बॉबी देओल' आणि 'रश्मिका मंदाना' हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याआधी होळीच्या मुहुर्तावर रणबीर कपूरचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याची आणि श्रद्धा कपूरची जोडी लोकांना खूप आवडली होती. या रोमकॉम सिनेमानंतर आता रणबीर ग्रे शेड भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमारश्मिका मंदानासोशल मीडिया