एकेकाळी कतरिना कैफच्या प्रेमात वेडापीसा झाला होता रणबीर कपूर, जीव द्यायलाही तयार होता अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:21 PM2021-04-06T12:21:37+5:302021-04-06T12:22:45+5:30
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ जवळपास ६ ते ७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.
सर्वांनाच माहित आहे की रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकेकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानपासून वेगळी झाल्यानंतर कतरिना कैफची अभिनेता रणबीर कपूरसोबत जवळीक वाढली होती. असे सांगितले जाते की कतरिना आणि रणबीर जवळपास ६ ते ७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. कालांतराने त्यांचे ब्रेकअप झाले होते.
विशेष बाब म्हणजे की आजही कतरिना कैफ आणि रणबीर कपूर एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि एकमेकांना भेटतात. कतरिना कैफ आजही सिंंगल आहे. तर रणबीर कपूरच्या आयुष्यात आलिया भटची एन्ट्री झाली आहे. एकवेळ अशी होती रणबीर कपूर अभिनेत्री कतरिना कैफच्या प्रेमात वेडापीसा झाला होता की त्याने एका मुलाखतीत तिच्यासाठी जीवपण देऊ शकतो असे म्हटले होते.
खरेतर एका मुलाखतीत रणबीरने म्हटले होते की, मी माझ्या जीवनात काही निवडक लोकांशी अटॅच्ड आहे आणि त्यांच्यासाठी जीवदेखील देऊ शकतो. रणबीर कपूरच्या निवडक लोकांमध्ये त्याचे कुटुंब, अयान मुखर्जी, कतरिना कैफ, रोहित धवन, आयशा दिवेत्री, इम्तियाज अली आणि अनुराग बासूचा समावेश आहे. कतरिना कैफमुळे दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे ब्रेकअप झाले होते.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तो 'अॅनिमल'मध्येही दिसणार आहे.
तर, कतरिना सध्या उदयपुरमध्ये 'फोन बूथ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत. तसेच ती टायगर ३मध्येही दिसणार आहे.